एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, जाणून घ्या नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत?
विशेष प्रतिनिधा
T20 वर्ल्डकप चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाच्या 3 स्टार खेळाडूंनी T20 इंटरनॅशनलला अलविदा केला आहे. शनिवारी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.After Rohit Sharma Virat Kohli Ravindra Jadeja also announced his retirement from T20
यानंतर स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मात्र, रवींद्र जडेजा वनडे आणि कसोटीत खेळत राहणार आहे.
रवींद्र जडेजाने इंस्टाग्रामवर टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफीसह एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मनापासून कृतज्ञतेसह, मी T20 आंतरराष्ट्रीय क
अरला अलविदा म्हणत आहे. अभिमानाने धावणाऱ्या घोड्याप्रमाणे मी माझ्या देशासाठी नेहमीच 100 टक्के दिले आहेत आणि देत राहीन. T20 विश्वचषक जिंकणे हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे, आठवणी, उत्साह आणि अतूट पाठिंब्याबद्दल धन्यवाद.’
रवींद्र जडेजा पहिल्यांदा 2009 मध्ये T20 विश्वचषक खेळला होता. तेव्हापासून त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या अष्टपैलू खेळाडूने 74 टी-20 सामन्यांमध्ये फलंदाजी केली आणि 21.46 च्या सरासरीने आणि 127.16 च्या स्ट्राइक रेटने 515 धावा केल्या.
याचबरोबर रवींद्र जडेजानेही गोलंदाजीतूनही भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. जडेजाने T20 सामन्यांमध्ये 7.62 च्या इकॉनॉमी आणि 29.85 च्या सरासरीने 54 विकेट घेतल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App