राहुल गांधींविरोधात महाराष्ट्र भाजपा आक्रमक, उद्या राज्यभर तीव्र आंदोलन!

Shelar new

 ‘’देशाचा अपमान सहन करणार नाही, ओबीसी समाजाची माफी मागितलीच पाहिजे.’’, अशी मागणी अशल्याचे आशिष शेलारांनी सांगितले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र भाजपाच्यावतीने उद्या राहुल गांधींच्याविरोधात राज्यभर आक्रमक आंदोलन केलं जाणार आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकारपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच ही घोषणा केली होती. Maharashtra BJP is aggressive against Rahul Gandhi statewide agitation tomorrow

आशिष शेलार म्हणाले, ‘’परदेशात भारताची बदनामी केल्याबद्दल तसेच ओबीसी समाजातील आडनावाच्या बदनामीचा प्रयत्न केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात २५ मार्च रोजी महाराष्ट्रभरात आक्रमक आंदोलन करण्याचे आम्ही ठरवले आहे. राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.’’

‘’हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात, लढत राहू’’ राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; भाजपानेही दिलं प्रत्युत्तर

‘’भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच घोषित केलं आहे की, उद्या महराष्ट्रभर आम्ही राहुल गांधींच्याविरोधात आक्रमक आंदोलन करणार आहोत. एकतर त्यांनी परदेशात जाऊन भारतीय व्यवस्था, भारतीय लोकशाही व्यवस्था, संसदीय प्रणाली, निवडणूक प्रक्रिया या सगळ्यावर टिप्प्णीच केली नाही तर त्यांची बदनामी केली. रोष व्यक्त केला आहे, विपर्यास केला आहे, खोटं बोलले आहेत.’ आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करणं, भाजपाला कदापि मान्य नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे, राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे म्हणून हे आंदोलन आहे.’’

‘’ या गांधी परिवाराचा अहंकार जणूकाही आभाळालाच पोहचला आहे. ते एका विशष्ट परिवाराचे आहेत म्हटल्यावर दुसऱ्या सगळ्या अर्णवांच्या परिवारांवर टिप्पणी करण्याचं जणूकाही त्यांना परवानाच मिळाला आहे. आमच्या ओबीसी समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न जो राहुल गांधींनी केला आहे. तो आम्हाला मान्य नाही, आक्रमक आंदोलन त्यासाठी सुद्धा आहे आणि ओबीसी समाजाची त्यांनी माफी मागितली पाहिजे.’’

https://youtu.be/8sztssh5d7k

Maharashtra BJP is aggressive against Rahul Gandhi statewide agitation tomorrow

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात