नाशिकच्या नवश्या गणपतीशेजारच्या दर्ग्याला महापालिकेची नोटीस; 7 दिवसांची मुदत, अन्यथा बुलडोझर कारवाई!!

प्रतिनिधी

नाशिक : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणानंतर शिंदे – फडणवीस सरकारने मुंबई सह महाराष्ट्रातील इस्लामी अतिक्रमणांवर बुलडोझर चालवायला सुरवात केल्यावर माहीम, सांगली कुपवाडमधील दर्गे, मशिदी पाडल्या. त्यानंतर नाशिक मधील नवश्या गणपती शेजारील दर्ग्याचा नंबर लागतो आहे. Nashik municipal corporation issue notice to dargah management next to navshya ganpati of 7 days

नवशा गणपती शेजारील दर्गा प्रशासनाला दर्ग्याला नाशिक महापालिका प्रशासनाने नोटीस पाठवली असून 7 दिवसांत खुलासा न केल्यास पालिका बुलडोझर चालवणार असल्याचा इशारा या नोटिशीतून दिला आहे.

राज ठाकरे सभेत माहीम आणि सांगलीमधील कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मुंबई, सांगली पाठोपाठ नाशिकमधील दर्ग्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू हुंकार सभेत शहरातील अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली होती.

त्यानंतर आज महापालिका प्रशासनाने संबंधित दर्गा ट्रस्टला नोटीस बजावली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेच्या नगररचना विभागाने नोटीस काढली असून दर्ग्याच्या बाजूला असलेले पत्र्याचे शेड, पक्के बांधकाम बेकायदेशीर असल्याचा प्रशासनाचा नोटीसमध्ये उल्लेख केला असून 7 दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. 7 दिवसांत खुलासा न केल्यास पालिका बुलडोझर चालवणार असल्याचा इशारा दिला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी नवश्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन केल्यावर हजरत सैय्यद हसन रांझेशाह बाबा रहेमतुल्लाह अलैह दर्ग्याची पाहणी केली. त्यानंतर हा दर्गाच पूर्ण अनधिकृत असून हे बांधकाम पाडण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली. त्यावेळी तेथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकऱ्यांसह पोलिसांचा चोख बंदोबस्त दर्ग्याबाहेर तैनात करण्यात आला होता.

Nashik municipal corporation issue notice to dargah management next to navshya ganpati of 7 days

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात