विनायक ढेरे
शिंदे- फडणवीस सरकारच्या काळातल्या विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस झाला. संपूर्ण अधिवेशन “खोके” या शब्दात भोवती वाजले – गाजले!! ठाकरे – पवारांची सत्ता हातातून गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटा विरोधात खोक्यांच्याच जोरजोरात घोषणा देऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आणि विधिमंडळात हल्लाबोल केला. Maharashtra All parties MLAs claims black money possessions, then why they averse of ED and CBI actions??
शिंदे गटात 50 आमदार आहेत हे पाहून शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदारांनी “50 खोके, एकदम ओके” अशा जोरदार घोषणा दिल्या. शिंदे गटाने पहिल्या दोन दिवसांमध्ये या घोषणा ऐकून घेतल्या. पण त्यानंतर मात्र विरोधकांचा हा हल्ला परतवून लावताना त्या “खोक्यांचाच” पलटवार केला. “लवासाचे खोके, बारामती ओके”, “महसूलाचे खोके, सोनिया ओके” अशा घोषणा शिंदे गटातल्या आमदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी दिल्या.
याचा अर्थ उघड आहे सध्याचे सत्ताधारी असोत किंवा आधीचे सत्ताधारी असोत प्रत्येकाला कोणाकडे किती “खोके” आहेत??, हे पक्के माहिती आहे… आणि आता जर या “खोक्यांची” माहिती केंद्रीय तपास संस्था सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी किंवा सीबीआय कडे पोहोचली आणि त्यांनी या “खोके धारकांवर” कठोर कायदेशीर कारवाई केली तर मग त्यांच्याविरुद्ध आरडाओरडा करण्यात काय मतलब आहे??
सध्याचा सत्ताधारी शिंदे गट हा आधीच्या ठाकरे – पवार सरकारमध्येही कार्यरत होताच. त्यावेळी त्यांच्याकडे “खोके” नव्हते का?? आणि मग जर आत्ताच “खोके” आले असतील तर ते कोणी दिले??, केव्हा दिले?? याचे तपशील विरोधकांपैकी शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे आमदार का देत नाहीत?? आणि या “खोक्यांची” सगळी माहिती सरळपणे ईडी किंवा सीबीआयला का देत नाहीत??
“खोक्यांची” माहिती द्यावीच!!
इतकेच नाही तर शिंदे गटाने ज्या पद्धतीने पलटवार केला आहे, त्यानुसार “लवासाचे खोके, बारामती ओके”, असेल आणि “महसूलाचे खोके, सोनिया ओके”, असेल तर त्या “खोक्यांची” माहिती शिंदे गट ईडी अथवा सीबीआयला का देत नाही?? दोन्ही गटांनी एकमेकांच्या खोक्यांची माहिती ईडी आणि सीबीआयला दिली की खरी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल की नाही?? मग असे करायला सध्याचे सत्ताधारी आणि विरोधक यांची नेमकी काय हरकत आहे??
ईडी, सीबीआय गैरवापराचा आरोप
तसेही केंद्रातले सध्याचे सत्ताधारी ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करतात, असा विरोधकांचा आरोप आहेच. पण ईडी आणि सीबीआयने केलेल्या कारवाईत जी संपत्ती जप्त होते, ती संपत्ती सोडवण्यासाठी विरोधक प्रयत्न का करत नाहीत?? प्रयत्न केला तर ते यशस्वी का होत नाहीत?? ईडीने मागितलेला काहीशे कोटी रुपयांचा हिशेब संबंधित संशयित अथवा आरोपी असलेले नेते का सादर करू शकत नाहीत?? त्यातही जेव्हा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उघडपणे एकमेकांवर खोक्यांच्या संख्येचे आरोप होतात तेव्हा दोन्ही बाजूंना एकमेकांकडे “खोके” आहेत हे माहिती आहे… मग जर त्या माहितीच्या आधारावर ईडी आणि सीबीआयने स्वतःहून कारवाई केली तर मग ईडीसीबीआयचा गैरवापर होतो असे म्हणायचा सत्ताधारी अथवा विरोधकांना हक्क तरी काय उरतो??
होऊनच जाऊ द्या!!
त्यामुळे एकदा होऊनच जाऊ द्या ना… “50 खोके, एकदम ओके”, “लवासाचे खोके, बारामती ओके” आणि “महसूलाचे खोके, सोनिया ओके” आहेत ना… इतकी माहिती उघडपणे सर्व आमदार देत आहेत, तर ईडी आणि सीबीआयने स्वतःहून जरूर कारवाईचा बडगा उगारावा!! हे आमदार हू की चू करणार नाहीत!!, अशी खात्री सर्वपक्षीय प्रमुखांनी जरूर द्यावी!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more