Eknath Shinde : अग बाई अरेच्या!!; “मनातले मुख्यमंत्री” की मनातले मांडे??


एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर अनेक खळबळजनक विधाने केली आहेत. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या “मनातले मुख्यमंत्री” होते, असा “गौप्यस्फोट” केला आहे. मात्र, हा गौप्यस्फोट करतात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी केलेल्या विधानाला छेद देत आहोत याची आठवण सुद्धा संजय राऊतांना राहिली नव्हती. कारण उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी गळ घातल्यावर आपण मुख्यमंत्री झालो, असे दोनच दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह मध्ये म्हटले होते. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नावही घेतले नव्हते.Chief minister of maharashtra “race in the minds” eknath shinde, Pankaja munde and supriya sule

पण आता हातातली सगळी बाजी निसटत चालल्याचे लक्षात येताच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या “मनातले मुख्यमंत्री” ठरवून टाकले आहे. जणू काही संजय राऊत यांना समोरच्याच्या मनातले “अग बाई अरेच्चा” सिनेमातल्या संजय नार्वेकरच्या पात्रासारखे ओळखूच येत आहे!!त्यानुसार आता एकदा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंच्या “मनातले मुख्यमंत्री” ठरवून टाकल्यानंतर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्या मनाला विचारतेयच कोण?? आणि तसेही मुख्यमंत्री होण्याचे मनातले मांडे केवळ उद्धव ठाकरेच खात होते असे नाही!!

असे मनातल्या मुख्यमंत्र्यांचे मनातले मांडे अनेकांनी खाल्ले आहेत. 2014 ते 2019 दरम्यान भाजपमध्ये नव्हत्या का जनतेचा “मनातल्या मुख्यमंत्री”!! पंकजा मुंडे यांनी स्वतःला जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असेच संबोधले होते ना!! 2019 मध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून दणकून पराभव झाल्यानंतर त्यांचे मन खट्टू झाल्याने काही काळ तरी त्यांच्या “मनातले मुख्यमंत्रीपद” उतरले होते.

पण शिवसेनेचा पेचप्रसंग सुरू होण्यापूर्वी काहीच दिवस आधी पंकजा मुंडे यांचे मनातले मुख्यमंत्रीपद हे विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्या इतपत खाली उतरल्याचे दिसत होते. शिवसेनेतला एकनाथ शिंदे एपिसोड सुरू झाला आणि मराठी प्रसार माध्यमांमधून पंकजा मुंडे यांचे “मनातले मुख्यमंत्रिपद” आणि विधान परिषदेची न मिळालेली उमेदवारी हे विषय गायब झाले!! पण मनातल्या मुख्यमंत्रिपदाचा विषय हा एकनाथ शिंदे आणि पंकजा मुंडे यांच्या पुरताच सीमित नाही.

महाराष्ट्रामध्ये आणखी एका नेत्याच्या मनातल्या मुख्यमंत्री दडल्या आहेत. सुप्रिया सुळे असे त्यांचे नाव आहे. मराठी प्रसार माध्यमांवर विश्वास ठेवला तर शरद पवार सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या “मनातल्या मुख्यमंत्री” आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 23 वर्षे उलटल्यानंतर जेव्हा-केव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल तेव्हा ते मुख्यमंत्रीपद सुप्रिया सुळे यांना मिळाले पाहिजे, असे शरद पवारांच्या मनात असल्याचे अनेक मराठी माध्यमे बोलून दाखवतात किंवा लिहून दाखवतात. पण हे जे काही आहे ते अजून तरी मनातल्या मनात चालले आहे एवढे मात्र नक्की!!

संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर उद्धव ठाकरे यांच्या “मनातल्या मुख्यमंत्रीपदाला. उजाळा देऊन एकनाथ शिंदे यांना डिवचून घेतले. पंकजा मुंडे यांचा मनातल्या मुख्यमंत्रिपदाचा विषय विधान परिषद उमेदवारी मिळवण्यावर येऊन थांबला आणि नंतर तो प्रसार माध्यमांमधून गायब झाला. सुप्रिया सुळे यांचे शरद पवारांच्या “मनातले मुख्यमंत्रीपद” मात्र अजून शाबूत आहे. आता पवारांच्या मनातील मुख्यमंत्रीपद जनतेला पसंत पडून ते बहुमतानिशी प्रत्यक्षात कधी येते आणि ते किती टिकते हे येणारा काळच सांगेल!!

कारण बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनातील शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचे अस्तित्व अडीच वर्षांच्या आसपास टिकून डळमळीत व्हायला लागले आहे, तर पवारांच्या “मनातील मुख्यमंत्री” तर अजून प्रत्यक्ष अस्तित्वात यायच्या आहेत. आता त्या केव्हा येणार आणि कशा येणार?? की त्या अस्तित्वात येईपर्यंत मनातले मांडे खावे लागणार??, हे पाहणे मोठे मनोरंजक ठरेल!!… एखादा नवा संजय नार्वेकर अग बाई अरेच्या पार्ट 2 मधून हे ओळखून दाखवू शकेल काय??

Chief minister of maharashtra “race in the minds” eknath shinde, Pankaja munde and supriya sule

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती