एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंचे “निदान” अचूक, “उपचार” चुकले; “डॉक्टर”ची निवड तर मोठी घोडचूक!!


एकनाथ शिंदे यांचे बंड हाताळण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना जी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत, त्याआधारे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे विश्लेषण करायचे झाले तर पुढच्या एका वाक्यात करताय येईल : उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या फुटीच्या दुखण्याचे “निदान” अचूक आहे, पण “उपचार” चुकलेत आणि डॉक्टरची निवड तर 100 % घोडचूक ठरली आहे!! Shivsena splits : Uddhav Thackeray’s assessment very right about BJP, but wrong in joining hands with Pawar and Congress

भाजपबद्दल अचूक निदान

उद्धव ठाकरेंनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधून भाजपवर शरसंधान साधताना भाजपला हिंदुत्वाच्या व्होटबँकेत मध्ये वाटेकरी नको आहे, असे म्हटले आहे. ते 100 % खरे आहे. भाजपलाच काय पण संघाला देखील त्यांच्या हिंदुत्वात कोणी वाटेकरी नको आहे. संघाची ही कार्यशैली डॉ. हेडगेवार यांच्या नंतरची आहे. त्यांना आपल्या हिंदुत्वात बाकीच्यांचे कोणतेही हिंदुत्व मिसळणे मान्य नाही. हा “नागपुरी रेशीमबागेचा खाक्या” आहे!!

सुधारकी परंपरेला नकार

पण त्याचबरोबर भाजपला देखील हिंदुत्वाच्या मतपेढीत वाटेकरी नको आहे ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजपचे हिंदुत्व हे सध्याच्या साधुसंतांच्या मेळाव्यांच्या मार्गाने जाते. हिंदुत्ववादी समाजसुधारकांच्या ऐहिक भाषेचे संघ आणि भाजपच्या हिंदुत्ववादाला वावडे आहे. त्यामुळेच हिंदुत्ववादी सुधारकांची परंपरा भाजप आणि संघ यांना मानवत नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपचे हे जे “निदान” केले आहे ते बरोबर आहे.!!

काँग्रेस-राष्ट्रवादी व्होटबँकेचा वाटा देतील का??

पण म्हणून त्यावर त्यांनी केलेला “उपचार” योग्य आहे का?? भाजपशी त्यांनी युती तोडली मोदींच्या नावावर मते मागून देखील सत्ता मिळाल्यानंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कळपात गेले. तरी देखील 2.5 वर्षांमध्ये शिवसेनेची अवस्था फुटीपर्यंत का येऊन ठेपली?? शिवसेनेला भाजपला जशी हिंदुत्वाच्या व्होटबँकेत शिवसेना वाटेकरी म्हणून नको आहे, तशी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांना शिवसेना आपल्या व्होटबँकेत वाटेकरी हवी आहे का?? काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची धर्मनिरपेक्ष मते शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत का??

पवार नावाचे डॉक्टर निवडण्यात चूक

उद्धव ठाकरे यांचे भाजप बद्दलचे जेवढे “निदान” अचूक आहे, तेवढा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बरोबर जाण्याचा “उपचार” चुकला आहे आणि त्या पलिकडे जाऊन सध्या शिवसेना नावाचा हिंदुत्ववादी पेशंट वाचविण्यासाठी शरद पवार नावाच्या डॉक्टरची त्यांनी केलेली निवड ही तर मोठी घोडचूक ठरली आहे!!

याच डॉक्टरच्या नेतृत्वाखाली ज्या राष्ट्रवादीने गेल्या अडीच वर्षात शिवसेनेचे आर्थिक दृष्ट्या कुपोषण केले, शिवसेनेचे सर्व आमदार राष्ट्रवादी विरोधात निधी वाटपाच्या मुद्यावरुन दोन्ही हातांनी तोंडावर जो शंख करत आहेत, ते करण्याची “शक्ती” राष्ट्रवादीने शिवसेनेच्या केलेल्या कुपोषणातूनच त्यांना मिळाली आहे ना!!

मग उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फुटीच्या दुखण्यावर शरद पवार नावाचा डॉक्टर निवडणे हे कसे काय बरोबर ठरू शकते?? उद्धव ठाकरे यांचे जे “निदान” भाजपच्या बाबतीत योग्य आहे तेच “निदान” आणि “उपचार” काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत 100% चुकले आहे आणि डॉक्टर निवडताना तर 100 पेक्षा जास्त टक्क्यांची घोडचूक झालेली दिसत आहे!!

कुणाच्या बापावर कुणाचे ओझे??

आज उद्धव ठाकरे यांनी भाषणांमधून आपल्या बापाच्या नावावर मते मागू नका. हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावावर मते मागा, असा दम भरला आहे. तो खराच आहे. शिवसेनेतल्या कोणत्याही आमदारांच्या बापाची जर तेवढी ताकद असती तर शिवसेनेतल्या प्रत्येक आमदाराने आपल्याच बापाच्या नावाने मते मागितली असती. यासाठी उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची, दमबाजीची किंवा आवाहनाची त्यांना गरजच पडली नसती. पण उद्धव ठाकरे यांच्याच बापाकडे प्रचंड मोठा राजकीय करिश्मा आणि कर्तृत्व होते म्हणून तर शिवसेनेचे सगळे आमदार त्यांच्या बापाच्या नावाने मते मागत होते. आजही शिवसेनेचे फुटलेले आमदार सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना आज आपला वैचारिक बाप मानतात, हे त्यांनी “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” हे नाव घेऊन सिद्ध केले आहे.

कायद्याच्या बापाला शक्य आहे का?

मग अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांच्या आपल्या बापाच्या नावावर मध्ये मागा या आव्हानाला तरी काय अर्थ उरला?? उद्धव ठाकरे यांची शिवसेना यापुढे बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाने मते मागणार आहे हे उघड आहे. तो त्यांचा जरूर हक्कही आहे. पण बाकीच्यांनी कोणी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायचे नाही, अशी मर्यादा घालता येणे “कायद्याच्या बापाला” तरी शक्य आहे काय??, हा कळीचा मुद्दा आहे!!

बाळासाहेबांचे नाव मर्यादित का करता??

उद्धव ठाकरे काय किंवा संजय राऊत काय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याला स्वतःहूनच एवढे काम मर्यादित करून ठेवत आहेत?? आणि शिवसेनेच्या “दुखण्या”वर विचार करण्यासाठी जे शरद पवार नावाचे डॉक्टर उद्धव ठाकरे यांनी निवडले आहेत ते डॉक्टर तरी उद्धव ठाकरे यांच्या बापाच्या नावाने मते मागणार आहेत का?? त्यांना तशी गरज आहे का?? हाही येथे कळीचा मुद्दा आहे. याचा उद्धव ठाकरेंना विचार करावासा वाटत नाही का??

शिवसेनेचा कंपाउंडर जबाबदार

म्हणूनच वर केलेले उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या दुखण्यावरचे “निदान” अचूक पण “उपचार” चुकले आणि डॉक्टर निवडण्यात तर 100 पेक्षा जास्त टक्क्यांची घोडचूक झाली हे म्हणणे भाग आहे!! शिवसेनेचा कंपाउंडर त्याला बऱ्याच प्रमाणात जबाबदार आहे!!

Shivsena splits : Uddhav Thackeray’s assessment very right about BJP, but wrong in joining hands with Pawar and Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात