मुख्यमंत्र्यांचे शरसंधान : इंदिराजींच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेबरोबर आता झाली पुरती फरपट!!


प्रतिनिधी

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारच्या काळातल्या विधिमंडळाच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करून घेतली. विधानसभेत भाषण करताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते पदावरुन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर विडंबन काव्यात्मक शरसंधान साधले. इंदिराजींच्या हाताची एकेकाळी किती होती वट, टोमणे सेने बरोबर आता झाली पुरती फरपट!!, असा टोमणा त्यांनी लगावला. CM eknath shinde targets Shivsena and Congress in maharashtra legislative assembly

विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसला संधी न देण्यात आल्यामुळे काँग्रेसमधील नाराजी उघड झाली होती. आता त्यावरूनच मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसला काव्यात्मक चिमटे काढले आहेत.

 काँग्रेसवर निशाणा

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कायमच डावलण्यात येत होते. त्याबाबत बाळासाहेब थोरात नेहमी माझ्याकडे तक्रार करत होते. आता विरोधी पक्षात असतानाही काँग्रेसची अवस्था वाईट आहे. महाविकास आघाडीची पुरती गेली रया… दादा, अंबादास बसले आणि काँग्रेसवाले हात चोळत बसले. विरोधी पक्षनेते पद देताना काँग्रेसला विचारण्यात देखील आले नाही. त्यावरुन काँग्रेसने जाहीर नाराजी देखील व्यक्त केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काव्यात्मक चिमटे

इंदिरा गांधींच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेबरोबर आता नुसती झाली फरफट!!, अशी काव्यात्मक टीका देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या या कवितांमुळे सभागृहात एकच हशा पिकला. तेव्हा आपण थोडे आठवले सुद्धा आहोत, अशी मिश्कील टिप्पणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

CM eknath shinde targets Shivsena and Congress in maharashtra legislative assembly

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात