विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 मध्ये त्यातल्या 48 पैकी फक्त 10 जागा लढवायचे ठरविले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या कलात या 10 जागांपैकी 10 जागांवर पवारांचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे पवारांनी प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत आघाडी घेण्यात तरी डबल डिजिट कामगिरी बजावली आहे.Loksabha elections 2024 results : Pawar’s party’s double digit performance in counting votes
मोजणीचे पहिले तीन राऊंड पार पडले आहेत. या तीन राऊंडमध्ये पवारांचे 10 पैकी 10 उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसले आहे. त्यामुळे पवारांचा स्ट्राइक रेट 100% असल्याचे वृत्त मराठी माध्यमांनी चालविले आहे. सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, भास्कर भगरे, अमोल कोल्हे, निलेश लंके, धैर्यशील मोहिते आदी उमेदवार आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आघाडीवर आहेत.
शरद पवारांनी महाराष्ट्रात आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीमध्ये कायमच सिंगल डिजिट कामगिरी बजावली. त्यांचे जास्तीत जास्त 9 उमेदवार आत्तापर्यंत निवडून आले आहेत. पण त्यावेळी पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती. यावेळी मात्र पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस कुठली आणि सगळे निवडणूक क्षम उमेदवार अजित पवार आपल्याबरोबर घेऊन गेले. परंतु, महाराष्ट्रात पवारांना सहानुभूतीची मते मिळाली. त्यामुळे पहिल्या तीन राऊंडमध्ये तरी पवारांचे उमेदवार आघाडीवर जाऊन पवारांनी आघाडी घेण्यात तरी डबल डिजिट कामगिरी बजावल्याचे चित्र दिसले आहे. ही आघाडी पुढच्या 12 ते 15 राऊंड मध्ये टिकवण्याचे आव्हान पवारांच्या उमेदवारांपुढे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App