वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर शनिवारी जाहीर झालेल्या पोल्समध्ये महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला फारशी चमकदार कामगिरी करता येणार नाही, असा अंदाज असला तरी अरुणाचल प्रदेशातून राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी आनंदाची बातमी आहे. तेथील विधानसभा निवडणूक निकालात तीन आमदार निवडून आले आहेत. Ajit Pawar’s NCP Flag in Arunachal; 3 candidates won in the assembly elections
अरुणाचल प्रदेशात 41 जागांवर BJPचा विजय
विधानसभेची मुदत संपत असल्याने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारीच पार पडली. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. यामध्ये भाजपने तब्बल 41 जागा जिंकत घवघवीत यश मिळवले. अन्य पाच जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याने विजयी जागांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कमाल
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 15 उमेदवार उभे होते. यापैकी तीन जण निवडून आले आहेत. तर तीन उमेदवार अतिशय थोडक्या मताने पराभूत झाले आहेत.अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष असून या ठिकाणी 46 आमदार जिंकत भाजपने विधानसभेतील आपली सत्ता राखली. तर राष्ट्र्वादीने देखील यात चांगलेच यश मिळवले आहे.
अरुणाचल प्रदेशात NCPने मिळवली 10% मते
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अरुणाचल प्रदेशातील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या असून पक्षाला एकूण 10 टक्के मते पडली आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दृष्टीने हा विजय राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
थोडक्या मतांनी पराभूत झाले राष्ट्रवादीचे उमेदवार
नामसांग विधानसभा मतदार संघ- नगोंगलीन बोई – 56 मतांनी पराभूत खोणसा पश्चिम विधानसभा मतदार संघ - यांग सेन माटे – 804 मतांनी पराभूत पक्के केसांग विधानसभा मतदार संघ – टेकी हेमू – 813 मतांनी पराभूत
अरुणाचल प्रदेश विधानसभेचा निकाल
एकूण जागांची संख्या – 60 भाजप – 46 नॅशनल पीपल्स पार्टी – 5 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 3 पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल – 2 काँग्रेस – 1 अपक्ष – 3
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App