विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांचा मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून प्रवास सुरू झाला आहे. या प्रवाशांचा प्रवास सुरू झाल्याने उपनगरी मार्गावर पूर्ण क्षमतेने लोकल धावणार आहेत. Local for every citizen stated in Mumbai
एप्रिलअखेरपासून ते १४ ऑगस्टपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा खुली होती. यापुढे लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या मध्य रेल्वेवरून आणि पश्चिम रेल्वेवरून ९० टक्के क्षमतेने लोकल धावत होत्या, तर १६ आणि १७ ऑगस्टपासून यामध्ये वाढ केली जाणार आहे.
मध्य रेल्वेवर कोरोनापूर्वी १७७४ लोकल फेऱ्या धावत होत्या, तर आता १६१२ फेऱ्या धावत आहेत. गर्दीचा आढावा घेऊन फेऱ्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे मध्य रेल्वेने सांगितले. पश्चिम रेल्वेवर कोरोनापूर्वी १३६७ लोकल फेऱ्या होत होत्या, तर एप्रिलनंतर फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी १४ ऑगस्टपर्यंत एकूण १२०१ फेऱ्या धावत होत्या; मात्र उद्यापासून (ता. १६) १३०० फेऱ्या धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App