National Hydrogen Mission ! भारतात पाण्यावर चालतील रेल्वे गाड्या आणि कार ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा ; जाणून घ्या सविस्तर


नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये तिसर्‍या ‘री-इन वेस्ट’ परिषदेत देशात राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्याची योजना प्रस्तावित केली होती.पेट्रोलियम इंधन सतत महाग होत आहे आणि प्रदूषण देखील वाढत आहे ,हे लक्षात घेता, हरित आणि अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे देशासाठी आवश्यक झाले आहे. यासाठी हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून केला जाईल. स्टील आणि सिमेंट उद्योगासारखे उद्योग कार्बन मुक्त करण्यासाठी देखील नॅशनल हायड्रोजन मिशन मोठी भूमिका बजावेल. National Hydrogen Mission | pm narendra modi announced national hydrogen mission trains cars would run by water fuel


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक घोषणा केल्या. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरून नॅशनल हायड्रोजन मिशन (National Hydrogen Mission) ची सुद्धा घोषणा केली आहे. मिशन अंतर्गत भारतात ग्रीन हायड्रोजनच्या क्षेत्रात ग्लोबल हब बनवण्याचे लक्ष्य ठरवले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी सुद्धा ग्रीन एनर्जी (Green Energy) ला भविष्यातील इंधन म्हटले होते. त्यांचे म्हणणे आहे की ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन दिल्याने आत्मनिर्भर बननण्यास मोठी मदत मिळू शकते.

कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबत्व कमी होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, देशाला मोठी उडी घेण्यात ग्रीन हायड्रोजन (Green Hydrogen) चे क्षेत्र मोठी मदत करेल. यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलची मागणी घटल्याने (Petrol-Diesel Demand) कच्च्या तेलावरील अवलंबत्व कमी होईल.इतकेच नव्हे, ग्रीन हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढल्याने प्रदूषणावर (Pollution) सुद्धा अंकुश लागेल. सोबतच हायड्रोजन गॅसला कम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) मध्ये मिसळून त्याचा वापर केला जाऊ शकतो. पीएम मोदी म्हणाले, मी आज तिरंग्याच्या साक्षीने नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा करत आहे.

ट्रेन आणि कार पाण्यावर चालतील

भारतात आता दोन टेक्नॉलॉजीच्या मदतीने हायड्रोजन गॅस बनवला जातो. अगोदर पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस केले जाते आणि हायड्रोजन वेगळा केला जातो. सोप्या शब्दात सांगायचे तर पाण्याच्या मदतीने हायड्रेजन बनवला जाईल आणि त्यावर कार चालतील.

मात्र, यातून केवळ हायड्रोजन गॅसने चालणार्‍या कार्सलाच इंधन मिळेल. दुसर्‍या टेक्नॉलॉजीत नॅचरल गॅसला हायड्रोजन आणि कार्बनमध्ये विभागले जाते. नंतर हायड्रोजनचा वापर इंधनासारखा केला जाऊ शकतो. तर वेगळ्या झालेल्या कार्बनने स्पेस, एयरोस्पेस, ऑटो, पाण्यातील जहाज आणि इलेक्ट्रॉनिक आयटम बनवता येऊ शकतात. भारतीय रेल्वेने नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन अंतर्गत हायड्रोजन फ्यूअल सेलचा वापर सुरूकेला आहे.
हायड्रोजन फ्यूअल सेल आधारित टेक्नॉलॉजीसाठी निविदा सुद्धा मागवल्या आहेत. हे तंत्रज्ञान उत्तर रेल्वेच्या सोनीपत-जिंद सेक्शनमध्ये डेमू ट्रेनवर लागू केले जाईल.

National Hydrogen Mission | pm narendra modi announced national hydrogen mission trains cars would run by water fuel

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*