सदैव अटल ! दांव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते।टूट सकते हैं, मगर हम झुक नहीं सकते ! अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली


माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज तिसरी पुण्यतिथी. देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वाजपेयी यांचे स्मरण केले. PM Modi pays tribute to Atal Bihari Vajpayee on his death anniversary


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयींच्या समाधी स्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांच्यासहित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील स्मृतीस्थळावर जाऊन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजधानी दिल्लीतील ‘सदैव अटल’ समाधी स्थळ येथे श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील श्रद्धांजली अर्पित केली .यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) इतर नेतेही यावेळी उपस्थित होते.

देशातील प्रमुख नेते आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे संस्थापक सदस्य वाजपेयी यांचे दीर्घ आजारानंतर 16 ऑगस्ट 2018 रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे निधन झाले होते. ते 93 वर्षांचे होते.

वाजपेयींनी तीन वेळा पंतप्रधान म्हणून काम केले. 1996 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. यानंतर त्यांनी 1998 आणि 2004 मध्ये देशाची सूत्रे हाती घेतली. देश त्यांचा वाढदिवस (25 डिसेंबर) ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा करतो. 2014 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा 1996 मध्ये 13 दिवसांसाठी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी 13 महिने केंद्रात सरकार चालवले.

1999 मध्ये ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आणि 2004 मध्ये एनडीएचा पराभव होईपर्यंत ते या पदावर राहिले. त्यांच्या कार्यकाळात भारताने अणुचाचण्या. त्याचबरोबर भारताने कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना धूळ चारली होती ती देखील अटलजींच्याच काळात.

PM Modi pays tribute to Atal Bihari Vajpayee on his death anniversary

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*