मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. महापौर पेडणेकर सध्या आशिष शेलार वादावरून चर्चेत आहेत. पेडणेकरांना यापूर्वीही २०२० मध्येही धमक्या आल्या होत्या. अज्ञाताने तेव्हा फोनवरून धमकी दिली होती. Letter threatening to kill Mumbai Mayor Kishori Pednekar, will lodge a complaint with the police
प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. महापौर पेडणेकर सध्या आशिष शेलार वादावरून चर्चेत आहेत. पेडणेकरांना यापूर्वीही २०२० मध्येही धमक्या आल्या होत्या. अज्ञाताने तेव्हा फोनवरून धमकी दिली होती.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुधवारी रात्री भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. पेडणेकर यांनी शेलार यांच्याविरोधात दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (अ) (दुहेरी अर्थाची टिप्पणी करणे) आणि 509 (महिलेच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद शब्द वापरणे) अंतर्गत शेलारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करणार आहेत. वरळी परिसरात झालेल्या सिलिंडर स्फोटप्रकरणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी बीएमसीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला होता. यादरम्यान त्यांनी वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, शेलारांनी बीएमसीच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App