महापौर किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरेंना दिल्या सदिच्छा; म्हणाल्या – राज साहेब लवकर बरे व्हा !


राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या आई यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांचं चेकअप करण्यात आलंय.Mayor Kishori Pednekar extends best wishes to Raj Thackeray; Said – Raj Saheb, get well soon!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी काही वेळापूर्वीच आली होती.राज ठाकरे हे लीलावती रुग्णालयातून उपचार घेऊन कृष्णकुंज परतले आहेत. आता ते 2 आठवडे होम क्वारंटाईन राहणार आहेत.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना लवकर बरे व्हा आणि काळजी घ्या अशा सदिच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या आई यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांचं चेकअप करण्यात आलंय. डॉक्टरांनी त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.

राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळा पुणे दौरा देखील केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला. पण त्यांची प्रकृती बरी नसल्याने इतर त्यांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते.

Mayor Kishori Pednekar extends best wishes to Raj Thackeray; Said – Raj Saheb, get well soon!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण