CDS Bipin Rawat Death : हवाई दलाकडून ट्राय-सर्व्हिस कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन, बिनबुडाच्या चर्चा टाळण्याचा लोकांना दिला सल्ला


तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले सीडीएस बिपिन रावत यांच्यावर आज दिल्ली कॅंटमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने त्रि-सेवा न्यायालयाची स्थापना केली आहे. यासोबतच हवाई दलाने बिनबुडाच्या चर्चा टाळण्याचा सल्लाही लोकांना दिला आहे.IAF has constituted a tri-service Court of Inquiry to investigate the cause of the tragic helicopter accident on 8 Dec


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले सीडीएस बिपिन रावत यांच्यावर आज दिल्ली कॅंटमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने त्रि-सेवा न्यायालयाची स्थापना केली आहे. यासोबतच हवाई दलाने बिनबुडाच्या चर्चा टाळण्याचा सल्लाही लोकांना दिला आहे.8 डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी त्रि-सेवा न्यायालय स्थापन करण्यात आल्याचे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे. तपास जलदगतीने पूर्ण करून वस्तुस्थिती बाहेर येईल. तोपर्यंत, मृतांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्यासाठी, बिनबुडाच्या चर्चा टाळायला हव्यात, असेही म्हटले आहे.

सीडीएस रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार

तामिळनाडूतील कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले सीडीएस बिपिन रावत यांच्यावर आज दिल्ली कॅन्टमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. दुपारी २ वाजता अंत्ययात्रा निघाली. या अपघातात बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला.

तत्पूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या पालम विमानतळावर जनरल बिपिन रावत यांच्यासह सर्व 13 शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबीयांचीही भेट घेतली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोवाल आणि तिन्ही लष्करप्रमुखांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

IAF has constituted a tri-service Court of Inquiry to investigate the cause of the tragic helicopter accident on 8 Dec

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात