‘’साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण’’ म्हणत अमोल कोल्हेंची घरवापसी!


काल अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर आज शरद पवारांकडे गेले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काल महाभूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात ३० ते ३५ आमदारांनी बंडखोऱी करत, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाहीतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची व अन्य आठ आमदरांनी मंत्रीपदाची शपथही घेतली. या शपथविधी सोहळ्यास अन्यही आमदार व राष्ट्रवादीच्या खासदारांची उपस्थिती होती. त्यापैकीच एक असेलेल शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज घरवापसी केली आहे. त्यामुळे हा शरद पवारांकडून अजित पवार गटाला दिलेला पहिला धक्का मानला जात आहे. Leaving Ajit Pawar MP Amol Kolhe went to Sharad Pawar

अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्याबरोबर असल्याचं स्पष्ट केलं आहे. “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। मी साहेबांसोबत…” असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं आहे. याशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत “पहिला मोहरा परत..!,” असं म्हटलं आहे. याशिवाय “आमदार कुठेही असले, तरी सर्वजण टीव्ही आणि परिस्थिती पाहत आहेत. ज्या पद्धतीने कराडमध्ये शरद पवारांना प्रतिसाद मिळत आहे. यानंतर प्रत्येक आमदाराला ही भीती वाटेल, की येणारे काळात शरद पवार दौरे सुरु करतील. आणि माझ्या मतदारसंघात सभा घेतील. त्यांनतर माझ्या मतदारसंघात वातावरण काय होईल,” असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Leaving Ajit Pawar MP Amol Kolhe went to Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात