Waqf Board चे शेतकऱ्यांच्या जमिनींवर अतिक्रमण; लातूर जिल्ह्यात 100 शेतकऱ्यांना नोटिसा; Waqf Board च्या विरोधात सरकार आक्रमक!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकार Waqf Board सुधारणा कायदा अंमलात आणण्यासाठी आक्रमक झाले असतानाच महाराष्ट्रात Waqf Board ने शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर मामला समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तळेगाव मधल्या 100 शेतकऱ्यांना Waqf Board ने नोटीसा पाठवले असून त्यांच्या 300 एकर जमिनीवर अतिक्रमण केले आहे.

वर्षानुवर्षे आपली वडिलोपार्जित जमीन कसून त्यावरच्या पिकांवर संपूर्ण जीवन चालवणाऱ्या शेतकऱ्यांचे उपजीविकेचे हक्काचे साधन काढून घेण्याचा Waqf Board चा डाव उघड्यावर आला आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर मधील Waqf Board च्या कार्यालयामध्ये 20 डिसेंबरला सुनावणी होणार असून त्या सुनावणीला हजर राहण्यासाठी अहमदपूर तळेगावच्या 100 शेतकऱ्यांना WaqfBoard ने नोटीसा पाठवल्या आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन WaqfBoard ला चांगलेच ठोकून काढले.WaqfBoard बोर्डाने त्यांच्या जुन्या कायद्याचा आधार घेऊन गावांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी हिंदू देवस्थानच्या जमिनी आणि मालमत्ता कब्जात घेण्याचा प्रकार केला आहे. परंतु, आता केंद्रातले आणि महाराष्ट्रातले भाजप सरकार ते सहन करणार नाही. जिथे जिथे Waqf Board ने जमिनीवर अतिक्रमण केले, त्या सगळ्या जमिनी आणि मालमत्ता सरकार सोडवून घेऊन त्यांच्या मूळ हक्कदार मालकांच्या ताब्यात देईल, असे बावनकुळे म्हणाले.

Latur farmers getting notices from Maharashtra Waqf Board over land

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात