गेल्या आठ दिवसांपासून चंद्रकांत जाधव यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. Kolhapur: Congress MLA Chandrakant Jadhav died during treatment
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे आज हैदराबाद इथे उपचार सुरू असताना निधन झाले. आज दुपारी १ वाजेपर्यंत चंद्रकांत जाधव यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असून दोन वाजेपर्यंत काँग्रेस समितीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर काशीद कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानातून दुपारी तीन वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. चंद्रकांत जाधव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या आठ दिवसांपासून चंद्रकांत जाधव यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.
जाधव यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला होता.त्यावेळी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आठ दिवसांपूर्वी जाधव यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना हैदराबाद येथे हलविण्यात आले.दुर्दैवाने उपचारांदरम्यान रक्तदाब कमी झाल्याने त्यांचे निधन झाले.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून ते पाहिल्यांदाच निवडून आले होते. कोल्हापूरातील मोठे उद्योगपती म्हणून चंद्रकांत जाधव याची ओळख होती. सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App