हिंगोली : ७६ किलो गांजा हळदीच्या शेतातुन जप्त ; आरोपीस अटक


या जप्त केलेल्या गांजाची ६.६९ लाख रुपये किंमत आहे.गांजाची लागवड केलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.Hingoli: 76 kg cannabis seized from turmeric field; Accused arrested


विशेष प्रतिनिधी

हिंगोली : राज्यासह जिल्ह्यात देखील गुटखा, गांजा यावर बंदी आहे.दरम्यान हळदीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.ही घटना वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात घडली आहे.

दरम्यान हट्टा ग्रामीण पोलीस पथकाने छापा टाकून या हळदीच्या शेतातुन तब्बल ७६ किलो गांजा जप्त केला आहे. दरम्यान या जप्त केलेल्या गांजाची ६.६९ लाख रुपये किंमत आहे.गांजाची लागवड केलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गुंडा शिवारातील शेतकरी उत्तम मारोतराव भालेराव यांनी आपल्या शेतात हळदीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केली होती. ही माहिती मिळताच १ डिसेंबर रोजी हट्टा ग्रामीण पोलिस पथकाने घटनास्थळी छापा मारला.दरम्यान यावेळी हळदीच्या शेतात 143 गांजाची झाडे आळून आली असता याप्रकरणी उत्तम मारोतराव भालेराव यास अटक केली.

Hingoli: 76 kg cannabis seized from turmeric field; Accused arrested

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती