भुकेल्या बिबट्याने बाई मारुन अर्धी खाल्ली

प्रतिनिधी

पुणे : वडगाव (ता. खेड) येथे झोपडीत झोपलेल्या स्त्रीवर रात्रीच्या बिबट्याने हल्ला केला. यात या स्त्रीला बिबट्याने ठार केले. बुधवारी (ता. 1) सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. वडगाव पाटोळे येथील बोरदरा साबळेवस्ती येथील जनाबाई वामन गडदे (वय 61) या त्या दुर्दैवी स्त्रीचे नाव आहे.Khed, Ambegaon, Junnar talukas of Pune district have a large number of leopards. Not a week goes by without a conflict between a leopard and a man.

जनाबाई या भावाच्या घराजवळ झोपडी बांधून राहत होत्या. मंगळवारच्या (31 ऑगस्ट) रात्री कधीतरी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना ठार केल्यानंतर त्यांचे शरीर अर्धवट खाल्ले. त्यानंतर बिबट्याने शरीराचा उरलेला भाग घराजवळच्या शेतात नेला. तिथेच ते शरीर टाकून बिबट्या पसार झाला.



बुधवारी सकाळी अकरा वाजता या घटनेची खबर गावकऱ्यांना लागली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. काही दिवसांपूर्वीच वन विभागाने वडगाव परिसरातूनच एक बिबट्या पिंजरा लावून पकडून नेला आहे. त्यानंतरही या भागात सातत्याने बिबट्याचा वावर नागरिकांना आढळून येत असून बिबट्याने तीन जीवघेणे हल्ले केले आहेत. मात्र वनविभागाला अद्याप हे बिबटे पकडता आलेले नाहीत.

दहशत वाढल्याने संध्याकाळी अंधार पडल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी चांगले उजाडेपर्यंत लोक घराबाहेर पडण्यास घाबरू लागले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले, विद्यार्थी यांचा वावर कमी झाला आहे.

कामानिमित्त बाहेर पडावे लागणारे लोकही जीव मुठीत घेऊन दहशतीच्या वातावरणातच फिरत आहेत. बिबट्यांच्या दहशतीमुळे त्रासलेले नागरीकांमध्ये वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे संताप निर्माण झाला आहे.

Khed, Ambegaon, Junnar talukas of Pune district have a large number of leopards. Not a week goes by without a conflict between a leopard and a man.

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात