बिबट्या-कुत्रा शौचालयात सात तास एकत्र

विशेष प्रतिनिधी

मंगळूर : भटक्या कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या हा फार्म हाउसच्या एका शौचालयात अडकला. विशेष म्हणजे या शौचालयात बिबट्‌या आणि कुत्रा सात तास एकत्र अडकले. त्यानंतर बाहेर पडण्याची वाट सापडताच बिबट्या कुत्र्याला न मारता उडी मारुन पळून गेला. ही घटना दक्षिण कन्नड जिल्ह्यात बिलिनेले गावात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.Seven hours together in the leopard-dog toilet

मिळालेल्या माहितीनुसार, रेगप्पा कुटुंबातील एका सदस्यांनी शौचालयात कुत्रा आणि बिबट्याला पाहून बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. घटनास्थळी कर्मचारी पोचल्यानंतर त्यांनी कुत्रा आणि बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.शौचालयाबाहेर पिंजरा ठेवला होता आणि चारही बाजूने जाळे पसरवले होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला देखील पाचारण करण्यात आले. दुपारपर्यंत बिबट्या आणि कुत्रा शौचालयात एकत्र होते. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात होते.

अखेरीस बिबट्याने कुत्र्यावर हल्ला न करताच शौचालयाबाहेर उडी मारुन पळ काढला. त्यानंतर कुत्रा देखील बाहेर आाला. वन खात्याचे बचाव अभियान सात तास चालले. या घटनेचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो शौचालयाच्या एका कोपऱ्यातून काढला आहे.

Seven hours together in the leopard-dog toilet

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*