विशेष प्रतिनिधी
पिंपरी : महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षात खान्देशाचा माणूस मुख्यमंत्री झाला नाही याची खान्देशाला फार मोठी खंत आहे, असे वक्तव्य भाजपचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. Khandesh’s man has not been CM in 70 years; Eknath Khadse’s mourning
महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागातले नेते मुख्यमंत्री झाले. पण खान्देशाचा माणूस अद्याप मुख्यमंत्री झाला नाही. मी मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो होतो. परंतु मला बाजूला करण्यात आले, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपली खंत व्यक्त केली.
यावेळी एकनाथ खडसे यांनी आपली तुलना भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी देखील केली. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचे धोरण आहे. भाजपासाठी लालकृष्ण आडवाणी यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. ते आज कुठे आहेत?, असा खोचक सवाल त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेतृत्वाला उद्देशून केला.
मी माझ्या राजकीय आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला. मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो. परंतु हा माणूस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राहता कामा नये यासाठी मला बाजूला करण्यात आले, असे टीकास्त्र देखील एकनाथ खडसे यांनी भाजप नेतृत्वावर सोडले आहे. देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असतात. त्यांनी पिंपरी-चिंचवडमधल्या महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेत उठवून दाखवावा, असे आव्हान देखील एकनाथ खडसे यांनी त्यांना दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App