विशेष प्रतिनिधी
धुळे – धुळे शहरातील अति प्राचीन श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात माघी गणेश उत्सव अर्थात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. Attractive decorations and religious programs at Siddheshwar Ganesh Temple in Dhule on the occasion of Ganesh Jayanti
धुळे शहरातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर हे पांझरा नदीकाठी वसलेले आहे. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माघी गणेश उत्सव अर्थात गणेश जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिरात गणेश याग 56 भोग महाआरती तसेच भंडारा महाप्रसाद, संगीत अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येत आहे. भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App