Jitendra Awhad : महाराष्ट्र शासनाने आता अफगाणिस्तानमध्ये आपले ऑफिस काढावे –जितेंद्र आव्हाड!

Jitendra Awhad

महाराष्ट्राचा कारभार कोण चालवतो? राज्यकर्ते की धार्मिक एजंट? असंही आव्हाडांनी विचारलं आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Jitendra Awhad राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे महायुती सरकारवर सातत्याने टीका करत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर निशाणा साधत काही प्रश्न विचारले आहेत.Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाडांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘’तमिळनाडू सरकारने तैवानमध्ये विशेष कार्यालय स्थापन केले आहे. तिथले अधिकारी चिनी भाषा बोलतात, उद्योजकांना मदत करतात, आणि तमिळनाडूमध्ये उद्योग उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून देतात. आणि आपले महाराष्ट्र सरकार?’’



‘’इथे रोज औरंगजेब जिवंत होतो—कधी विधानसभेत, कधी कनकवलीत. सरकारच्या योजना काय? मल्हार सर्टिफिकेट, झटका-हलाल प्रमाणपत्र, आणि धार्मिक घोषणा. रोजगार निर्मिती, गुंतवणूक, किंवा उद्योग धोरणांवर चर्चा करायला वेळ नाही.’’

‘’महाराष्ट्र शासनाने आता अफगाणिस्तानमध्ये आपले ऑफिस काढावे. तिथे धार्मिक तणाव वाढवण्याच्या सल्लागार सेवा द्याव्यात. जगभरच्या धार्मिक कट्टरतावाद्यांसाठी ‘महाराष्ट्र कन्सल्टन्सी’ सुरू करावी! कारण सरकारचा भर केवळ धार्मिक राजकारणावर आहे.’’

‘’राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला येत असताना, उद्योग बाहेरच्या राज्यांत जात असताना, सरकार काय करते? शासकीय निधी त्यांनाच मिळेल, जे सत्ताधाऱ्यांना मत देतील, असे मंत्र्यांनी उघडपणे सांगितले. उद्योग, उत्पादन, निर्यात, कृषी क्षेत्र यांचा सरकारला विसर पडलेला आहे.’’

‘’सोन्याचा धूर पुन्हा यायचा असेल, तर धर्माचा धूर उंबरठ्याच्या आत ठेवायला हवा. निर्यात आयातीपेक्षा कितीतरी पट वाढवायला हवी. तमिळनाडू सरकार उद्योगधंद्यांना चालना देण्याचा विचार करतं, आणि आपलं सरकार औरंगजेब, भोंगे, हलाल-झटका यावर घाम गाळतं. मग प्रश्न असा आहे—महाराष्ट्राचा कारभार कोण चालवतो? राज्यकर्ते की धार्मिक एजंट?’’

Jitendra Awhads criticism of the grand alliance government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात