Jayant Patil : अजितदादांना त्यांच्याच राष्ट्रवादीचे बारामतीतून “परस्पर” तिकीट; जयंत पाटलांची “करामत”!!

Jayant Patil

विशेष प्रतिनिधी 

नागपूर : बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार निवडणूक लढवणार की नाही हे ते स्वतःच ठरवणार आहेत. त्यांनीच काही दिवसांपूर्वी बारामतीतून नवा आमदार निवडावा असे जाहीररित्या बारामतीकरांना आव्हान दिले होते. अजित पवार यांच्याऐवजी बारामतीतून जय पवार लढतील, अशा अटकळीही बांधल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अजितदादांनाच बारामतीतून “परस्पर” तिकीट जाहीर करून टाकले. अजितदादाच बारामतीतून निवडणूक लढवतील, असे जयंत पाटलांनी परस्पर पत्रकारांना सांगून टाकले.

जयंत पाटील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने गोंदिया जिल्ह्यात होते. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी अजित पवारच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असा दावा केला.

शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून अजित पवारांना लक्ष्य केले. मी शरद पवारांना सोडून चूक केली, असे वक्तव्य अजितदादांनी गडचिरोलीत केले होते. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अजित पवारांनी काय बोलायचं यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत, आणि कन्सल्टंट काय सांगतात त्यानुसार ते बोलत असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत नाहीत, त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला.


Ajit pawar : अजितदादांची म्हणे, अमित शाहांकडे मुख्यमंत्री पदाची मागणी; “द हिंदू”ची बातमी धादांत खोटी!!


आगामी विधानसभा निवडणूक सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला 155 जागा मिळत असल्याचा अंदाज आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की ह्या जागा वाढून 175 पर्यंत जागा आम्हाला मिळतील. तर, अजित पवार हे बारामतीमधूनच विधानसभेची निवडणूक लढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर अपघात प्रकरणांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अपघात केला, याविषयी बोलण्यासाठी महायुतीचे नेते टाळाटाळ करीत आहेत. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, आता याबाबतीत खराखुरा तपास पोलिसांनी करावा, सर्व सीसीटीव्ही तपासावे आणि त्यानंतरच आम्ही योग्यवेळी बोलू.

न्या. चंद्रचूड योग्य तो निर्णय घेतील

न्यायमूर्ती चंद्रचूड हे आता निवृत्त होणार आहेत, परंतु त्यांच्या काळातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे दोन गट झाले होते. याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड हे निवृत्तीपूर्वी याबाबत योग्य तो निर्णय घेतील.

Jayant Patil “announced” ajit pawar’s candidature from baramati

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात