विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांच्या तरतुदीसाठी 1 महिन्याची मुदत देत मनोज जरांगे यांनी आपले उपोषण आज स्थगित केले. यासाठी खासदार संदिपान भुमरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांची शिष्टाई कामाला आली. शंभूराज देसाई यांच्या मागणीला विनंती देऊन त्यांनी हा निर्णय घेतला. 1 महिन्यात सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे जरांगे म्हणाले, तसेच 1 महिन्यात काम न झाल्यास निवडणूक लढवून विरोधातले उमेदवार नावे घेऊन पाडण्याचा इशारा जरांगे यांनी दिला. Jarange’s hunger strike called off, warning to contest elections
जरांगेंनी काय केल्या मागण्या?
सगेसोयऱ्यांची अमंलबजावणीची आम्ही दिलेली व्याख्याच ग्राह्य धरावी. मराठा आणि कुणबी एकच आहे. कायदा पारीत कराला आधार लागतो. हा आधार मिळाला आहे. हैदराबादचे गॅझेट. पूर्ण मराठा कुणबी असल्याच्या सरकारकडे नोंदी आहेत. सातारा संस्थानकडे या नोंदी आहेत. अंतरवालीसह राज्यभरातील मराठा कार्यकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. शिंदेंची समिती रद्द करु नये. त्या समितीला मनुष्यबळ देऊन सतत काम करण्याची मुभा द्यावी.
लातूर, नांदेडमध्ये कार्यकर्ते आक्रमक
लातूर बीड महामार्गावर मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाज आक्रमक झाला. सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा, आणि सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नांदेडमध्ये सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी नांदेड आणि यवतमाळच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि त्यांची तब्येतही आता खालावत चालल्याने मराठा समाज आक्रमक झाला. ओबीसी प्रवर्गातून मराठा समजाला आरक्षण द्यावे तसेच सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. मात्र, आता मनोज जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App