प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार यांनी दिलेला सल्ला दिलेले सल्ले महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात गाजत आहेत. त्या सल्ल्यांवरूनच मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जरांगे पाटलांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मान्य आहे, पण त्यांनी अजित पवारांचा सल्ला अमान्य केला आहे.Jarange Patals accept Ambedkar’s advice; But Ajitdad’s advice is invalid!!
प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मनोज जरांगे पाटलांना एक सल्ला दिला. हा सल्ला आपणास 100 % मान्य आहे, पण अजित पवारांचा सल्ला मान्य नाही. त्यांनी मला सल्ला देण्याऐवजी आपल्या माणसांनाच सल्ला द्यावा, असा टोला मनोज जरांगे पाटलांनी लगावला.
आंबेडकरांचा सल्ला काय होता??
संविधान सभेत बोलताना शनिवारी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे तोपर्यंत मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी एक तारतम्य बाळगावे, जी चूक सोनिया गांधी यांनी केली होती. ती त्यांनी करू नये. सोनिया गांधी यांनी “मौत का सौदागर” असे शब्द वापरून विरोधकांना संधी दिली होती. तशी चूक करून जरांगे पाटलांनी विरोधकांना संधी देऊ नये. आपल्या वक्तव्यातून मराठा आरक्षणाच्या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतोय असे दाखवू नये. कारण आरक्षणासाठी ही मोठी लढाई आहे.
आंबेडकर यांचा सल्ला मान्य
सोनिया गांधी यांनी जी चूक केली, ती तुम्ही करु नका, असा सल्ला प्रकाश आंबडेकर यांनी दिला. आंबेडकर यांनी दिलेला सल्ला मला मान्य आहे. पण माझा कोणीच सल्लागार नाही. मी कधीच जातीवाद करत नाही. माझ्या परिसरातील सर्व जातीधर्माचे लोक माझ्यासोबत आहे. मी प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला आजपासून पूर्णमान्य केला. मी ती चूक करणार नाही.
अजितदादांनी आपल्या लोकांना सल्ला द्यावा
महाराष्ट्रात सध्या वाचाळवीर जास्त झाले आहेत त्यांनी आपले तोंड आवरावे असा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. पण अजित पवारांनी मला सल्ला देण्याऐवजी आपल्याच लोकांना सल्ले द्यावेत. कारण त्यांचेच लोक जास्त भडकाऊ भाषणे देत आहेत. अजितदादांनी त्यांना आधी आवरावे, असा टोला जरांगे पाटलांनी हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App