IT Raids Shivsena : यशवंत जाधव ते बजरंग खरमाटे व्हाया राहुल कनाल – संजय कदम; अनिल परबांना घेरण्याची तयारी??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : यशवंत जाधव ते बजरंग खरमाटे व्हाया राहुल कनाल – संजय कदम… ही परिवहन मंत्री अनिल परब यांना घेरण्याची तयारी तर नाही ना!!, अशी उघड चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. IT Raids Shivsena: From Yashwant Jadhav to Bajrang Kharmate via Rahul Kanal – Sanjay Kadam; Ready to surround Anil Parbhan ??

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने शिवसेना नेत्यांवर जाळे टाकले आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरांवर घातलेल्या छाप्यांपासून सुरू झालेली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ही मोहीम आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती शिर्डी संस्थानचे विश्वस्त आणि युवा सेनेचे कोअर कमिटीचे पदाधिकारी राहुल कनाल, परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्ती शिवसेना संघटक संजय कदम आणि निकटवर्ती परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.



बजरंग खरमाटे यांच्या पुण्यातील घरांवर छापेमारीची बातमी आहे. अनिल परब यांच्याशी संगनमत करून बजरंग खरमाटे नागपूर आणि पुण्यात परिवहन खात्यातील बदल्यांमधून यांनी भरपूर माया कमावल्याचा किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. आता बजरंग खरमाटे यांच्या पुण्यातल्या घरावर छापेमारी सुरू असल्याच्या बातम्या आहेत.

याचा अर्थ नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांना घेरण्याची तयारी सुरू झाली आहे, असे राजकीय वर्तुळात मानण्यात येत आहे. 15 फेब्रुवारीला संजय राऊत यांनी शिवसेना भवनात प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यावेळी देखील अशीच छापेमारी करण्यात आल्याची आठवण अनेकांनी काढली आहे. पण या वेळेच्या छाप्यांमध्ये फरक असा की बजरंग खरमाटे यांचे नाव आधी आले असले तरी राहुल कनाल आणि संजय कदम यांची नावे मात्र आधी चर्चेत नव्हती. त्यांच्या घरांवर छापे पडल्यामुळे शिवसेनेत खळबळ माजली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

IT Raids Shivsena: From Yashwant Jadhav to Bajrang Kharmate via Rahul Kanal – Sanjay Kadam; Ready to surround Anil Parbhan ??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात