Nitin Gadkari : निलंबित एपीआय सचिन वाझे, त्यांचा अंबानींच्या घरासमोर आढळलेल्या कारमधील स्फोटकांशी संबंध, त्यानंतर आलेलं परमबीर सिंग यांचं धक्कादायक पत्र यामुळे अवघ्या देशभरात विविध चर्चांना सुरुवात झाली. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी द प्रिंट या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केलं आहे. It is sad to see Maharashtra discredited, says Union Minister Nitin Gadkari
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निलंबित एपीआय सचिन वाझे, त्यांचा अंबानींच्या घरासमोर आढळलेल्या कारमधील स्फोटकांशी संबंध, त्यानंतर आलेलं परमबीर सिंग यांचं धक्कादायक पत्र यामुळे अवघ्या देशभरात विविध चर्चांना सुरुवात झाली. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी द प्रिंट या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केलं आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, महाराष्ट्राला संतांचे राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्याला एक संस्कृती, इतिहास आहे. राज्याबद्दल जेव्हा अशा प्रकारचं राष्ट्रीय स्तरावर ऐकायला, पाहायला मिळतं तेव्हा एक मराठी माणूस म्हणून निश्चितच दु:ख होतं. महाराष्ट्राची बदनामी होताना पाहून वाईट वाटतंय.
राज्यातील आघाडी सरकारबद्दल प्रश्न विचारतात गडकरी म्हणाले की, ही जी आघाडी आहे ती मुळातच अनैसर्गिक आहे. तिन्ही पक्षांचे विचार एकमेकांशी जुळत नाहीत. केवळ भाजपच्या विरोधापोटी ते एकत्र आले आहेत. पण राष्ट्रीय राजकारणात आल्यापासून मी राज्याच्या राजकारणात लक्ष घालणे सोडून दिले आहे. विविध विकास प्रकल्पांवर माझे लक्ष असते. मी मागच्या सहा महिन्यांपासून मुंबईत गेलेलोही नाही.
राज्यातील पक्षाचे भविष्य काय याबद्दल विचारताच गडकरी म्हणाले की, भाजपचं राज्यातलं भविष्य काय हे एकतर जेपी नड्डा सांगतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगतील. मी राज्याच्या राजकारणात लक्ष घालणं केव्हाच सोडून दिलंय.
महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येबद्दल विचाल्यावर गडकरी म्हणाले की, कोरोना ही आपत्ती आहे. ती पूर्ण जगावर आलेली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येसाठी एखाद्या व्यक्तीला, पक्षाला किंवा सरकारला दोष देणं चूक ठरेल. आम्ही सर्व मिळून प्रयत्न करत आहोत.
दरम्यान, या मुलाखतीत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राहुल गांधी, सध्याच्या विधानसभा निवडणुका, प्रगतिपथावर सुरू असलेले महामार्गांचे प्रकल्प अशा विविध विषयांवर दिलखुलास मत व्यक्त केले.
It is sad to see Maharashtra discredited, says Union Minister Nitin Gadkari
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App