लवकरच कोरोना लसीचा तिसरा डोस, भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनच्या बुस्टर डोसच्या ट्रायलला मंजुरी

Bharat Biotech vaccine covaxin booster dose Trial approved by SEC

Bharat Biotech : देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना आता कोरोना लसीबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. ड्रग रेग्युलेटरच्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी (एसईसी) ने भारत बायोटेकची कोरोनावरील लस कोव्हॅक्सिनच्या चाचणीत भाग घेतलेल्या स्वयंसेवकांना तिसरा डोस चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. हैदराबादस्थित कंपनीने दोन डोसनंतर तिसर्‍या म्हणजे बूस्टर डोसच्या चाचणीसाठी औषध नियामकांकडे प्रस्ताव पाठवला होता. Bharat Biotech vaccine covaxin booster dose approved by SEC


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना आता कोरोना लसीबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. ड्रग रेग्युलेटरच्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी (एसईसी) ने भारत बायोटेकची कोरोनावरील लस कोव्हॅक्सिनच्या चाचणीत भाग घेतलेल्या स्वयंसेवकांना तिसरा डोस चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. हैदराबादस्थित कंपनीने दोन डोसनंतर तिसर्‍या म्हणजे बूस्टर डोसच्या चाचणीसाठी औषध नियामकांकडे प्रस्ताव पाठवला होता.

तिसरा डोस हा दुसर्‍या डोसच्या 6 महिन्यांनंतर दिला जाईल

चाचणीच्या टप्प्यात सहभागी स्वयंसेवकांना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 6 महिन्यांनी तिसरा डोस देण्यास एसईसीने मंजुरी दिली आहे. बूस्टर डोस दिल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत भारत बायोटेक त्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती घेत राहील. या तिसऱ्या डोसमुळे त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्तीत काय बदल होतो, ते विषाणूच्या नवनव्या रूपांना कसे सामोरे जातात, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

तिसर्‍या डोसचा काय फायदा?

कोव्हॅक्सिनचा तिसरा डोस लागू झाल्यानंतर कोरोना विषाणूविरुद्ध शरीराची प्रतिकारशक्ती अनेक वर्षांपर्यंत वाढेल, असा विश्वास भारत बायोटेकने सरकारकडे व्यक्त केला होता. यासह कोविड-19 चे नवीन रूपांपासूनही संरक्षण मिळेल. नवे स्ट्रेन म्युटेशन करू शकणार नाहीत. यानंतर एक्स्पर्ट पॅनलने बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे.

Bharat Biotech vaccine covaxin booster dose approved by SEC

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात