CM Uddhav Thackeray will address the people tonight at 8.30 pm about Lockdown In Maharashtra

Lockdown In Maharashtra? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेला करणार संबोधित

Lockdown In Maharashtra? : महाराष्ट्रात कोरोना संसर्गात प्रचंड वाढ झाल्याने राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात राज्य सरकार आज निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री लॉकडाउनबाबत महत्त्वाची घोषणा करू शकतात. CM Uddhav Thackeray will address the people tonight at 8.30 pm about Lockdown In Maharashtra


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्गात प्रचंड वाढ झाल्याने राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात राज्य सरकार आज निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री लॉकडाउनबाबत महत्त्वाची घोषणा करू शकतात.

उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

आपल्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे कोरोनाच्या परिस्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक घेणार असून याच बैठकीत लॉकडाऊनबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी 28 मार्च रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाच्या स्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. त्या वेळी त्यांनी लॉकडाउन लागू करण्याचा इशाराही दिला होता. ते अधिकाऱ्यांना म्हणाले होते की, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे, तरीही लोक ऐकत नसतील तर लॉकडाऊनसाठी रोडमॅप तयार करा.

पुण्यात 7 दिवसांचा मिनी लॉकडाउन

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुण्यात सात दिवसांचे मिनी लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. लॉकडाउनसंदर्भात एक मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. आवश्यक सेवा लॉकडाउनमधून वगळल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार पुढील सात दिवस बार, हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद राहतील. होम डिलिव्हरीच्या सुविधेत मात्र सूट आहे.

या गाइडलाइननुसार, विवाह आणि अंत्यसंस्कार वगळता इतर सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. जास्तीत जास्त 20 लोक लग्नाला उपस्थित राहू शकतात आणि अंत्यसंस्कारात 50 जण उपस्थित राहू शकतात. सरकारचा हा आदेश उद्यापासून लागू होणार आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.

CM Uddhav Thackeray will address the people tonight at 8.30 pm about Lockdown In Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*