विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीमध्ये भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतरही त्यांना राज्यसभेत पाठविले. परंतु आता विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपबरोबर राहून काही फायदा होत नाही असे पाहिल्यावर भाजपला डॅमेज करून महायुतीतून खसकण्याचा डाव अजितदादांची राष्ट्रवादी खेळते आहे का??, असा सवाल अजितदादांच्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वक्तव्यातून समोर आला आहे. Is ajit pawar targeting to snap ties with mahayuti after damaging BJP??
गेल्या काही दिवसांपासून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी वेगवेगळ्या मुद्द्यावर ठाकरे, पवारांना किंवा काँग्रेसला टार्गेट करण्याऐवजी भाजपच्याच नेत्यांना टार्गेट करत सुटले आहेत. त्यावरून अजितदादांच्या राष्ट्रवादीभोवती संशयाचे दाट मळभ तयार झाले आहे.
पुण्यातील ड्रग्स प्रकरणावरून अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत दादा पाटलांना टार्गेट केले आणि आता त्यांनी महायुतीच्या जागा वाटपावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसला 55 जागा मान्य नसल्याचे सांगत स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे.
– अमोल मिटकरी म्हणाले :
महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला स्वबळावर निवडणूक लढवावी.
महायुतीत जर आम्हाला 55 जागा मिळत असतील तर त्यात आम्ही समाधानी असणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडीतील तिन्ही महत्त्वाचे पक्ष सध्या 100 जागांवर दावा करत आहेत. महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला निवडणूक वेगळी लढावी लागेल.
आमदार अमोल मिटकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर हे मोठे विधान केले. त्यामुळे अजित पवार गट महायुतीतून खसकून बाहेर पडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का??, याची चर्चा सुरू झाली आहे.
अमोल मिटकरींनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि मूर्तीजापूर या भाजपच्या मतदारसंघांवर दावा सांगितला.
तीनही पक्षाचे नेते भेटणार
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीचे नेते आणि तिन्ही पक्षाचे प्रवक्ते मुंबईत एकत्र भेटणार आहेत. सध्या तिन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावर होणार चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. या टिकेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात फोनवरून संवाद झाल्याची बातमी समोर आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more