
प्रतिनिधी
मुंबई : ब्राह्मण समाजाचा अवमान करणारे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. त्याविरोधात ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांनी अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध करणारे आंदोलने केली. परंतु अमोल मिटकरी स्वतःच्या वक्तव्यावर ठाम आहेत.Insult of Brahmin community: Jayant Patil Dhananjay Munde shook hands with Amol Mitkari’s statement !!, sorry after two days
उलट राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याची ते माफी मागण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर ज्या सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या व्यासपीठावर अमोल मिटकरी यांनी भाषण केले त्या मिटकर यांच्या वक्तव्याबद्दल जयंत पाटील यांनी दोन दिवसानंतर दिलगिरी व्यक्त केली आहे.
ब्राह्मण समाजाचा अवमान करण्याचा अथवा त्यांना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. कोणी दुखावले गेले असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. ब्राह्मण समाजासह खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी महाविकास आघाडी सरकारने अमृत योजना काढली आहे, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी करून अमोल मिटकरी यांचे वक्तव्य वैयक्तिक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मत नाही, अशा शब्दांमध्ये हात झटकून टाकले आहेत, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी जातीपातीचा विषय आमच्या मनाला देखील शिवत नाही. अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मत म्हणून नव्हे तर स्वतःचे मत म्हणून ते मांडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांच्या वक्तव्याचा संबंध नाही, असा दावा करत आपलेही हात मिटकर यांचे वक्तव्य पासून काढून घेतले आहेत.
अमोल मिटकरी यांनी सांगली जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी संवाद मेळाव्यात कन्यादाना संदर्भातले मंत्र म्हणून ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली होती. त्यावेळी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे विकट हास्य करण्याचे व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाले होते. मात्र त्यानंतर त्यानंतर ब्राह्मण समाजाने आंदोलन केल्यानंतर देखील मिटकर यांनी माफी मागायला नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ब्राह्मण समाज संघटनांनी आंदोलने केली आणि त्यानंतर जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा पासून स्वतःचे हात झटकून टाकले आहेत.
Insult of Brahmin community: Jayant Patil Dhananjay Munde shook hands with Amol Mitkari’s statement !!, sorry after two days
महत्त्वाच्या बातम्या
- Nawab Malik ED : नवाब मलिकांविरोधात 5000 पानी आरोपपत्र!!; दाऊद – हसीना पारकर कनेक्शन भोवले!!
- सूर्यावरच्या स्फोटांमुळे लाटेचे उत्सर्जन; उपग्रहसंचार-जीपीएसवर परिणाम ?
- ब्रिटिश पंतप्रधानांच्या हस्ते वडोदऱ्यात बुलडोझर यूनिटचे उद्घाटन, साबरमतीत चरख्यावर सूत कातले
- मुंबईत पावसाच्या सरीमुळे नागरिकांना दिलासा; पश्चिम महाराष्ट्, मराठवाड्यात ढगाळ वातावरण