पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आळंदीला पळून गेलेल्या गजानन बुवा चिकणकरला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. Inhuman beating of elderly wife; Gajanan Buwa Chikankar, who left for Alandi as soon as the video went vira
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्या वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या वृद्ध किर्तनकार गजानन बुवा चिकणकरला हिललाईन पोलिसांनी अखेरीस अटक केली आहे. सोशल मीडियावर आपल्या पत्नीला बादलीने आणि हाताने अमानुषपणे मारहाणा करतानाचा गजानन बुवा चिकणकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर चिकणकरवर कारवाई करण्यात यावी यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत होती.
समाजमाध्यमांमध्ये या प्रकरणावरुन संतप्त प्रतिक्रीया उमटल्यानंतर कल्याण पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली. पत्नीला मारहाण केल्यानंतर चिकणकर आळंदीला वारीसाठी गेल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर पोलिसांनी एक पथक तात्काळ आळंदीला रवाना करत या बुवाला बेड्या ठोकल्या आहेत.
https://youtu.be/EUISdCmXqLA
काय आहे नेमकं प्रकरण?
घरात पाण्यावरुन झालेल्या वादानंतर ८५ वर्षीय गजानन बुवा चिकणकरने आपल्या पत्नीला मारहाण केली. ३१ मे रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. गजानन बुवाच्या १३ वर्षीय नातवाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडीओत गजानन बुवा आपल्या पत्नीला मारहाण करत असताना घरातला एकही सदस्य त्याला थांबवण्यासाठी पुढे आला नाही. यानंतरही पत्नीने तक्रार देण्यास नकार दर्शवला. पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करत गजानन बुवा चिकणकरला आळंदीतून अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App