राज्यात उन्हाचा चटका, उकाड्याने जनता हैराण; अनेक ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात उन्हाचा चटका जाणवत असून , उकाड्याने जनता हैराण झाली आहे. अनेक ठिकाणी तर पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरीपुढे आहे. In the state hot summer, Mercury above 40 degrees Celsius in many places

पुढील दोन दिवसांनंतर मात्र तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.  राज्यात १३ मार्चपासून तापमानातील वाढ सुरू झाली होती. राजस्थानपासून गुजरातपर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली होती. मुंबई परिसराचे कमाल तापमान सरासरीच्या तुनलेत ५ ते ६ अंशांनी वाढले होते. सध्याही मुंबई परिसरातील कमाल तापमान सरासरीच्यचा तुलनेत अधिक आहे. राजस्थान, दक्षिण मध्य प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भातही काही भागात उष्णतेची लाट आली आहे. जवळपास सर्वच भागातील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे.



मराठवाडय़ात  सर्वच भागांतील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे. त्यामुळे या भागातही उन्हाचा चटका तीव्र आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर आदी भागांतही कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, सरासरीच्या तुलनेत ते ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. राज्यात आणखी एक ते दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

In the state hot summer, Mercury above 40 degrees Celsius in many places

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub