जायंट किलर्सचे आपकडून नुसतेच कौतुक, मंत्रीमंडळात स्थान मात्र नाही


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, कॅ. अमरिंदर सिंग यांच्यासह सुखबीरसिंग बादल, नवज्योतसिंग सिध्दू यांच्यासारख्या जायंट किलर्सचे आम आदमी पक्षाकडून नुसतेच कौतुक करण्यात येत आहे. त्यांना मंत्रीमंडळात स्थान मात्र दिले गेले नाही. त्यामुळे पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.Just a compliment to the Giant Killers, but no place in the cabinet

आम आदमी पार्टीने शुक्रवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळातील 10 मंत्र्यांची नावे निश्चित केली. यामध्येदुसºया वेळी निवडून आलेल्या दोघांचा वगळता इतरांकडे दूर्लक्ष करण्यता आले आहे. माजी विरोधी पक्षनेते हरपाल सिंग चीमा दिरबा येथून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.



गुरमीत सिंग मीत कौर या बर्नाला येथून दुसºयांदा आमदार झाल्या आहेत. बाकीचे आठ मंत्री हे पहिल्यांदाच आमदार आहेत. मलोत येथील डॉ.बलजीत कौर, जंदियाला येथील हरभजन सिंग ईटीओ, मानसाचे डॉ. विजय सिंगला, भोवा येथील डॉ. लालचंद कटारू चक, अजनाला येथील कुलदीपसिंग धालीवाल,

पट्टी येथील लालजीतसिंग भुल्लर, होशियारपूर येथील ब्रम शंकर आणि हरजोत सिंग यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला आहे. डॉ विजय सिंगला यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचा पराभव केला. ले नाही.

माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा पराभव करणारे गुरमीत सिंग खुदियान, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांचा पराभव करणारे जगदीप सिंग कंबोज गोल्डी, माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा दोन मतदारसंघात पराभव करणारे लाभ सिंग उघोके आणि डॉ. बलबीर सिंग यांच्याकडे दूर्लक्ष करण्यात आले आहे.

राज्यात सर्वाधिक 70,000 मतांनी विजयी झालेले सुनमचे आमदार अमन अरोरा यांनाही मंत्री म्हणून संधी देण्यात आलेली नाही.पहिल्या यादीत पक्षाने अनुसूचित जातीतील चार जणांना स्थान दिले आहे. माळवा भागातील पाच, माढा भागातील चार आणि दोआबा भागातील एका नेत्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

केवळ एका महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. यादीत चार जाट, चार अनुसूचित जाती आणि दोन हिंदू आहेतपंजाब विधानसभेत 117 सदस्य आहेत. त्यामुळे . मान यांच्या मंत्रिमंडळात नियमानुसार १७ मंत्री असू शकतात.

Just a compliment to the Giant Killers, but no place in the cabinet

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात