2009 मध्येच शिवसेनेसोबत राष्ट्रवादी लोकसभा निवडणूक लढवणार होती; सुनील तटकरेंचा नवा गौप्यस्फोट!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या निवडणुकीत नेमकी कुणाबरोबर युती किंवा आघाडी करून सत्ता मिळवणार होती, याचे वेगवेगळे गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आधी केले आहेतच, पण आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी गौप्यस्फोटांची लडी लावली आहे. In 2009, the NCP was going to contest the Lok Sabha elections with the Shiv Sena

राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 मध्ये भाजपने न मागताच फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता, पण त्या आधीच्या म्हणजे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत जाऊन निवडणुका लढवणार होती, असा नवा गौप्यस्फोट खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे.


“सिंचनदादा” उल्लेखावर सुनील तटकरे भडकले; उद्धव ठाकरेंचे भाजप कनेक्शनच बाहेर काढले!!


सुनील तटकरे म्हणाले :

2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीत आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविल्याचे सांगितले. मात्र नंतर नेतृत्वाने तो निर्णय फिरवला. काही कारणामुळे ते शक्य होणार नाही शिवसेनेसोबत जाता येणार नाही असे नेतृत्वाने सांगितले.

2014 मध्ये भाजपने न मागताच राष्ट्रवादीने फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेत नेतृत्वाने अशी अनेक स्थित्यंतरे घडविली, मग आता आम्ही भाजपसोबत जाऊन काय चूक केली??

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडलेल्या मंत्रीमंडळातील लोकांचे अनेकांनी कौतुक केले. मात्र आमचेच काहीजण टीका आजही करत आहेत. काहीजणांना नैराश्य आले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने आम्ही भाजपसोबत गेलो अशी टीका आता करत आहेत. परंतु “त्या” तर आता स्वतःच्या सावलीलाही घाबरतात. अशा लोकांनी आमच्यावर टीका करणे कितपत योग्य आहे??

ग्रामपंचायत निवडणूक निकालात दोन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस राहिली आहे याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने पाठिंबाच दिला आहे.

आता देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण काम करीत आहोत.

In 2009, the NCP was going to contest the Lok Sabha elections with the Shiv Sena

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात