विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहिल्याच पावसाने मुबंईची दाणादाण उडवली असून आता पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.IMD warns Mumabi about heavy rain
हवामान खात्याने शहरात शहरात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. ‘रेड’ अलर्ट अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवतो. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांतही मोसमी पाऊस दाखल झाला आहे. बहुतांश भागांत पाऊस पडत आहे.
कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी ‘रेड’; तर काही ठिकाणी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांना पावसाने झोडपून काढले. शहरात सकाळी केवळ तासाभरात ६० मिलिमीटर पाऊस; तर १२ तासांत १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App