प्रतिनिधी
सातारा : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला खोचक सवाल केला आहे.If the state government is indifferent then how will Sambhaji Raje’s movement succeed
मराठा समाजाच्या मागणीबद्दल राज्य सरकारचा उदासीन असेल तर संभाजीराजांच्या आंदोलनाला यश कसे मिळेल? असा तो खोचक सवाल आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजे म्हणाले, मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. तसेच दर दहा वर्षांनी जातिनिहाय जनगणना करून आरक्षण फक्त गरीब गरजू व्यक्तींना देण्यात यावे, हे मत मी फार पूर्वी व्यक्त केले आहे. मराठा समाजासाठी राज्य सरकारने काढलेल्या सारथी संस्थेचे नेमके स्टेटस काय आहे? संस्थेकडे निधी किती आहे? तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ मंडळाकडे निधी किती आहे? यविषयीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी यापूर्वीच केली होती.
परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोपही खासदार उदयनराजे भोसले यांनी केला संभाजीराजे यांनी उपोषण मागे घ्यावे आणि तब्येतीला जपावे असे आवाहनही त्यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App