‘’मला तडजोड करावी लागली तर…’’ राज ठाकरेंचं चिपळूणमध्ये पदाधिकारी बैठकीत विधान!

raj-thackeray

आगामी १५ दिवसांत मेळावा घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार

विशेष प्रतिनिधी

चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी रत्नागिरीतील चिपळूणमध्ये पदाधिकाऱ्यांना बैठकीत मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीवरही आपली भूमिका स्पष्ट केली. If I have to compromise I will sit at home Raj Thackerays statement in office bearers meeting in Chiplun

राज ठाकरे म्हणाले, ‘’राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही.’’  याचबरोबर, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर येत्या १५ दिवसांत मेळावा घेऊन भाष्य करणार असल्याचंही सांगितलं आहे. तसेच, नाका तिथे शाखा ही मोहीम राबवण्याचे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

याशिवाय, हव्यासापोटी राजकारण अस्थिर… अस्थिरतेमुळे उद्योगविश्वात अविश्वास… विद्वेषामुळे समाज अस्वस्थ… अत्याचारामुळे महिला असुरक्षित… बेरोजगारीमुळे तरुणाई खचलेली… महागाईमुळे कुटुंब त्रस्त… प्रश्नांचा पाढा वाचावा तितका कमीच… महाराष्ट्र चौफेर खदखदतोय पण याच ज्वलंत प्रश्नांवर मतदारराजा मतदान करेल की पुन्हा खोट्या अस्मितेच्या लाटेवर स्वार होईल… तुम्हाला काय वाटतं? असा  सवाल  मनसेने ट्वीटद्वारे केला आहे.

If I have to compromise I will sit at home Raj Thackerays statement in office bearers meeting in Chiplun

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात