अभिनेत्री प्रियदर्शनीने अमेरिकेच्या दौऱ्यानदरम्यान आलेला अनुभव केला शेअर
विशेष प्रतिनिधी
पुणे : सोनी मराठी या वाहिनीवर येणाऱ्या महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात या कार्यक्रमाचा चाहता वर्ग आहे. सध्या या कार्यक्रमाचं प्रसारण बंद आहे. कारण हास्य जत्रा या कार्यक्रमाची संपूर्ण टीम सध्या अमेरिका दौरा करत आहे. Maharashtrachi Hasya Jatra America tour.
View this post on Instagram A post shared by Priyadarshini Indalkar (@shini_da_priya)
A post shared by Priyadarshini Indalkar (@shini_da_priya)
नेहमीप्रमाणे अमेरिकेतील प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमनं खळखळून हसवलं आणि आपला कार्यक्रम सादर केला मात्र कार्यक्रम स्थळी पोहचे पर्यंत या कलाकाराची बरीच तारांबळ उडाली.प्रियदर्शनीने त्यांचा अनुभव सोशल मिडीयावर शेअर केलाय. प्रियदर्शनीने त्यांचा अमेरिकेतल्या धावपळीचा व्हिडीओ शेअर केलाय. प्रियदर्शनी लिहीते.. आमची flight cancel झाली. ४ वाजता न्यू जर्सी ला शो होता आणि आम्ही २ वाजेपर्यंत अजून बॉस्टन ला च होतो. हे समजल्यावर लगेच बॉस्टन च्या महाराष्ट्र मंडळाचे लोक airport वर पोचले. आमच्यासाठी by road जाण्याची व्यवस्था करण्यात आली. NJ च्या लोकांना mail पोहोचली की ४ चा शो ७ वाजता सुरु होईल कारण असं असं झालय.
प्रियदर्शनी पुढे लिहीते.. रस्त्यात जेवणासाठी १६ min थाबुंन आम्ही full स्पीड ने ५ तासांच्या drive साठी निघालो. नेमका traffic ने आम्हाला त्रास दिला. गेल्या गेल्या शो सुरु करता यावा म्हणुन आम्ही गाडीतच मेक अप केला. केस आवरले. प्रेक्षकाना zoom call करुन विनंती केली की अजून काही काळ please कळ सोसा, आम्ही पोहोचतच आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App