वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई आयआयटीला आपल्या हद्दीत संशोधन, विकास आणि चाचणीसाठी ड्रोन उड्डाणास परवानगी मिळाली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चलाही अंदमान-निकोबार बेटे तसेच मणिपूर आणि नागालॅण्डमध्ये लांब अंतरावर कोरोना लशी आणि औषधांचे वितरण करण्यासाठी ड्रोन वापराची संमती मिळाली आहे. ICMR, IIT can fly drone
नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने नुकतीच ड्रोन वापराची संमती दिली. दोन्ही संस्थांना ड्रोन नियमांमधून सशर्त सलवत देण्यात आली आहे. आयसीएमआरला ड्रोन तीन किलोमीटर उंच उडवता येतील. एक वर्षासाठी किंवा पुढील सूचना लागू होईपर्यंत मंजुरी लागू असेल. याआधी तेलंगणा राज्यातील विकराबाद भागात अशा प्रकारे पहिल्या ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’ अर्थात ड्रोनमार्फत औषध पाठवण्यास सुरुवात करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App