
विशेष प्रतिनिधी
मुंबई : NCP राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची नव्हे तर अजित पवारांची पक्षाचे घड्याळ चिन्हही अजित पवारांकडे दिल्याचा निकाल निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्यानंतर शरद पवारांची कोणतीही ताजी प्रतिक्रिया आलेली नाही, त्याउलट शरद पवार गटाने त्यांचा 2022 चा मी म्हातारा झालो नाही. तुमचा पाठिंबा असेपर्यंत मी थकणार नाही आणि थांबणार ही नाही, असे वक्तव्य केलेला जुनाच व्हिडिओ व्हायरल केला आहे. I will not tire or stop until I have your support sharad pawar old video viral
निवडणूक आयोगाच्या निकालावर उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदा झाल्या आणि त्यांनी एकमेकांवर टीका केली. अजित पवारांनी शरद पवारांची राजकीय हत्या केली असा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला “ध” चा “मा” करणाऱ्यांवर मी बोलत नसतो, असे प्रत्युत्तर अजित पवारांनी दिले.
२०२२च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत!!#sharadpawar… pic.twitter.com/agB3W4nROh
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 6, 2024
पण निवडणूक आयोगाच्या एवढ्या महत्त्वाच्या निर्णयावर स्वतः शरद पवारांनी पुढे येऊन कोणतीही ताजी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यामुळे शरद पवार गटाने त्यांचा जुना व्हिडिओ शोधून काढून मी म्हातारा झालो नाही. तुमचा पाठिंबा असेपर्यंत थकणार नाही आणि थांबणारही नाही, असे “ताजे” वक्तव्य केल्याचा आभास निर्माण केला.
– पवार गट कोणते चिन्ह सुचविणार??
शरद पवार गटाला आता 7 फेब्रुवारी 2024 दुपारी 3.00 वाजेपर्यंत स्वतःच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यांचे तीन पर्याय निवडणूक आयोगाला सुचवायचे आहेत आणि त्यानंतर निवडणूक आयोग राज्यसभा निवडणुकीपुरता निकाल देऊन शरद पवार गटाला त्यांनी सुचवलेल्यापैकी एक नाव आणि एक चिन्ह बहाल करणार आहे. शरद पवार गटाने कोणतेही नाव अथवा चिन्ह उद्या दुपारपर्यंत सुचवले नाही, तर ते आणि त्यांचा पक्ष किंवा गट राज्यसभा निवडणुकीत “अपक्ष” गणले जाणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या गटातल्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवारांच्या व्हिपच्या विरोधात मतदान केले, तर त्यांची आमदारकी धोक्यात येणार आहे.
I will not tire or stop until I have your support sharad pawar old video viral
महत्वाच्या बातम्या
- अबकी बार 400 पार वगैरे ठीक, पण मोदींनी भाजपसाठी लोकसभेत सांगितलेल्या 370 आकड्याचा नेमका अर्थ काय??
- मोदींनी लोकसभेत नेहरूंचे नाव घेतले; राहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने सावरकरांना वादात ओढले!!
- लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा आदेश
- अबकी बार NDA 400 पार, भाजपा 370; पंतप्रधान मोदींनी लोकसभेतल्या भाषणात सेट केले “टार्गेट”!!