धनंजय मुंडेंनी केले त्याचे समर्थन करणार नाही; पण त्याचा राजकीय फायदाही घेणार नाही, पंकजा मुंडे यांनी केले स्पष्ट

धनंजय मुंडे यांनी जे केले त्याचे समर्थन करणार नाही. पण त्यांच्या परिवाराची हानी किंवा संकट असेल त्याचा राजकीय फायदा घ्यावा एवढी छोटी मी नाही, असे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.I will not support what Dhananjay Munde did; But I will not take political advantage of it, Pankaja Munde clarified


प्रतिनिधी

मुंबई : धनंजय मुंडे यांनी जे केले त्याचे समर्थन करणार नाही. पण त्यांच्या परिवाराची हानी किंवा संकट असेल त्याचा राजकीय फायदा घ्यावा एवढी छोटी मी नाही, असे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे दुसरे लग्न आणि एका तरुणीने त्यांच्यावर आरोप केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याबाबत एका वृत्तत्राला दिलेल्या मुलाखीत बोलताना, पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत.



त्यामुळे धनंजयच नव्हे तर कोणाही बाबतीत घडले असते तर मी अशीच वागले असते. मी कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाबाबत कधीही सार्वजनिक स्टेटमेंट करत नाही किंवा पाठीमागेही बोलत नाही.

हे माझे एक तत्व आहे. कोणाही बाबतीत घडले असते तर मी अशीच वागले असते.पंकजा म्हणाल्या, धनंजय आणि आम्ही एकाच परिवारातील आहोत. त्यांच्या परिवाराची हानी किंवा संकट असेल त्याचा राजकीय फायदा घ्यावा एवढी छोटी मी नाही.

राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. अपयशावर त्याच्या अडचणींवर मला इमारत बांधायची नाही. धनंजय मुंडेंच्या बाबतीत जे घडले त्यावर मी त्याचे समर्थन करू शकत नाही, हे मी स्पष्ट केले आहे.

कारण मी जेव्हा जन्मले तेव्हा मी पहिली स्त्री आहे हे निसर्गाकडून समजले. नंतर मी कोणाची मुलगी आहे, माझ्याकडे काय वारसा आहे ते कळले. त्यामुळे मी माझे मत मांडले. मी त्याचा राजकीय फायदा घेण्याचा उद्देश नाही, भूतकाळातही केले नाही.

महाराष्ट्राला मी विसरणार नाही, महाराष्ट्र माझी मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे, असे सांगत भविष्यात देशाच्या राजकारणात जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मी भविष्यकार नसल्याने मला पुढचे काही भाकित करता येणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

I will not support what Dhananjay Munde did; But I will not take political advantage of it, Pankaja Munde clarified

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात