विशेष प्रतिनिधी
मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसक घटनांवरून अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने काढलेल्या मोर्चामध्ये दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रभर तणावपूर्ण शांतता आहे.Huge uneasiness among Shiv Sainiks over Shiv Sena’s changing stance on Amravati riots
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी हे मोर्चे आयोजित करणाऱ्या रझा अकादमी बाबत जी सौम्य भूमिका घेतली आहे, त्यावरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. रझा अकादमीचा एकूण इतिहास त्याविषयी शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाने सौम्य भूमिका घ्यावी याबद्दल मुंबई, पुणे, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शिवसैनिकांमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे.
ज्या रझा अकादमीने 2012 मध्ये मुंबईत दंगल घडविली. हुतात्मा स्मारकाची विटंबना केली, त्या रझा अकादमी विषयी शिवसेनेचे सध्याचे नेतृत्व कशी काय अनुकूल भूमिका घेऊ शकते?, अशी विचारणा अनेक शिवसैनिकांनी केली आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यातले राजकीय वैर एवढ्या पातळीपर्यंत पोहोचले आहे का? की भाजपला ठोकून काढत असताना शिवसेनेने थेट रझा अकादमी अनुकूल ठरेल अशी भूमिका घ्यावी?, असा सवाल शिवसैनिक करताना दिसत आहेत. या भूमिकेमुळे शिवसेनेची हिंदुत्ववादाची ओळख पुसली जाण्याची भीती शिवसैनिकांना भेडसावत आहे.
त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे निमित्त करून मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये पोलिसांवर दगडफेक, दंगे
याआधी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय तपास संस्थांचा ससेमिरा चुकवण्यासाठी भाजपशी जुळवून घेण्याचा शिवसेना नेतृत्वाला सल्ला दिला होता. परंतु अमरावती, मालेगाव, भिवंडी, नांदेड इथल्या दंगलींचा विषय सर्वस्वी भिन्न आहे. हिंदू -मुसलमान दंगलीत शिवसेनेने मुंबईत जी भूमिका वठवली होती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक ज्या पद्धतीने 1992 – 93 च्या दंगलीत हिंदू समाजाला वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरला होता त्यामुळे शिवसेनेची कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख झाली. ही ओळख आता अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी या दंगलींच्या निमित्ताने पुसली गेली तर शिवसैनिक कोणत्या तोंडाने हिंदू समाजाला मते मागू शकतील? असा सवाल शिवसैनिक विचारताना दिसत आहेत.
अनेक शिवसेना नेत्यांना हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया नाशिक मधल्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. या नेत्यांनी नाशिकचे महापौरपदही भूषविले आहे. परंतु, आज उघडपणे हे नेते शिवसेनेच्या नेतृत्वावर बोलायला तयार नाहीत. मात्र शिवसेनेची ओळख हिंदुत्ववादी पक्ष म्हणून जर पुसली गेली तर तिला राजकीय किंमत मोठ्या प्रमाणावर चुकवावी लागण्याची भीती देखील या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपशी राजकीय वाद करण्यासाठी शिवसैनिकांची हरकत नाही. भाजपला सोडून अन्य पक्षांची आघाडी करून सरकार चालविण्यातही या शिवसैनिकांना काही गैर वाटत नाही. पण शिवसेनेची मूळ ओळख ही हिंदूंचा कैवारी असलेला पक्ष ही कायम टिकूनच राहिली पाहिजे, ही शिवसैनिकांची आग्रही भूमिका असल्याचे यातून दिसून येते. शिवसेनेच्या पुण्यातील एका वरिष्ठ नेत्याने हे मत व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या ठाण्यातील एका नेत्याने याबाबत पक्षप्रमुखांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे. परंतु नाव मात्र उघडपणे देण्यास त्याने नकार दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादाचा संस्कार आणि वारसा घेऊन समाजात वावरणारे हे नेते आहेत. त्यांना जर शिवसेनेच्या ओळख पुसण्याविषयी भीती वाटत असेल तर शिवसैनिकांसाठी आणि पक्ष नेतृत्वासाठी देखील ही चिंतेची बाब ठरू शकते. “आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत हे शिवसैनिक कडवट आहेत. शिवसेना सोडणे हा विचारही त्यांच्या आमच्या मनाला शिवत नाही. पण शिवसेनेने हिंदुत्वाचा सोडता कामा नये असेही आम्हाला वाटते,” असे मत पुण्यातील शिवसेना नेत्यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेनेच्या हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखी विषयी मते व्यक्त करणारे शिवसेनेचे जुने नेते आणि शिवसैनिक आज जरी नावे घेऊन उघडपणे बोलत नसले तरी त्यांची प्रातिनिधिक मते आणि अस्वस्थता मात्र झाकून राहताना दिसत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App