Stamp Duty : घर किंवा जमीन खरेदी करणे आता आणखी महाग होणार आहे. ठाकरे सरकारने मुद्रांक शुल्कावरील 2% सूट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता घर आणि जमीन खरेदीवर तुम्हाला 5% मुद्रांक शुल्क भरावे लागेल. House Buying Become Expensive Now, Thackeray government’s refuses to extend the concession in stamp duty
विशेष प्रतिनिधी
मुंबई : घर किंवा जमीन खरेदी करणे आता आणखी महाग होणार आहे. ठाकरे सरकारने मुद्रांक शुल्कावरील 2% सूट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता घर आणि जमीन खरेदीवर तुम्हाला 5% मुद्रांक शुल्क भरावे लागेल.
तत्पूर्वी, असे सांगण्यात येत होते की, मुद्रांक शुल्कावरील सूट 3 महिन्यांसाठी वाढविण्यात येईल. परंतु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधानंतर ही सवलत मागे घेण्यात आली आहे. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात सवलत देण्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव दिला होता. परंतु वित्त विभाग आणि मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही.
गतवर्षी, राज्य सरकारने राज्यातील बांधकाम उद्योगांना चालना देण्यासाठी डिसेंबर 2020 पर्यंत मुद्रांक शुल्कावर 3 टक्के सूट दिली होती. त्यानंतर मार्चपर्यंत दोन टक्के सूट देण्यात आली. पण आता ही सवलत रद्द करण्यात आली आहे. आता तुम्हाला घर किंवा जमीन खरेदीवर पूर्ण 5% मुद्रांक शुल्क भरावे लागेल.
महाराष्ट्र विकास आघाडी शासनाने सन 2021-22 साठीच्या वार्षिक मुल्यांकन दर तक्त्यात (रेडी रेकनर दर) मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीचा वार्षिक मुल्यांकन दर तक्ता (रेडी रेकनर दर) सन 2021-22 साठी कायम ठेवण्यात येत आहे.@MahaDGIPR @maharevenue pic.twitter.com/CIKLX3WpLj — Balasaheb Thorat (@bb_thorat) March 31, 2021
महाराष्ट्र विकास आघाडी शासनाने सन 2021-22 साठीच्या वार्षिक मुल्यांकन दर तक्त्यात (रेडी रेकनर दर) मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीचा वार्षिक मुल्यांकन दर तक्ता (रेडी रेकनर दर) सन 2021-22 साठी कायम ठेवण्यात येत आहे.@MahaDGIPR @maharevenue pic.twitter.com/CIKLX3WpLj
— Balasaheb Thorat (@bb_thorat) March 31, 2021
यात दिलासादायक बाब म्हणजे महिलांच्या नावाने घर खरेदीसाठी होणाऱ्या दस्तावर मुद्रांक शुल्कातून 1 टक्का सवलत देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. याची तरतूद नुकत्याच आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ही सवलत महिलांना फक्त घरांसाठी आहे, जमिनीसाठी नाही. याशिवाय खरेदीत पुरुष भागीदार असेल तरीही सवलत मिळणार नाही. 1 एप्रिल 2021 पासून ही सवलत लागू आहे.
दुसरीकडे, ठाकरे सरकारने सन 2021-22 साठी रेडीरेकनरमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच गतवर्षाचेच रेडी रेकनर सन 2021-22 मध्ये लागू राहील.
House Buying Become Expensive Now, Thackeray government’s refuses to extend the concession in stamp duty
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App