फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा


वृत्तसंस्था

पॅरिस : फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असून मोठ्या संख्येने लोक अडचणीत आले आहेत. त्यामुळे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशभरात लॉकडाऊन लागू केलं आहे. Lockdown announced for the third time in France

कोरोना बाधितांची अनियंत्रित आकडेवारी पाहता देशभरात महिन्याभरासाठी हे लॉकडाऊन लागू केले आहे.



राष्ट्रपती इमॅन्युएल म्हणाले की, “जर आपण आता हे पाऊन उचललं नाही तर कोरोनावरील आपली पकड सर्व प्रकारे गमावून बसू. लॉकडाऊन दरम्यान केवळ आवश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर कार्यालयातील लोकांना फक्त घरुन काम करावे लागेल. पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. या चार आठवड्यांत कोणत्याही प्रकारची जाहीर सभा होणार नाही, त्यांच्यावर पूर्ण बंदी असेल.”

 

कोरोना नियमांचे पालन करा – इमॅन्युएल 

राष्ट्रपती इमॅन्युएल पुढे म्हणाले की,  कोणीही कारणाशिवाय घर सोडणार नाही. लोकांना घाबरण्याची गरज नाही तर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

कोरोनाची आकडेवारी 46.46 लाखांवर

फ्रान्समधील कोरोनाची एकूण आकडेवारी 46.46 लाखांवर गेली आहे. मृतांचा आकडा वाढून 95 हजार 502 झाला आहे. आयसीयूमध्ये 5000 लोक दाखल आहेत. ब्रिटनहून आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे फ्रान्समध्ये कोरोनाची स्थिती अतिवाईट बनली आहे.  फ्रान्समध्ये काल 29 हजार 575 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 28 मार्च रोजी ही संख्या 41 हजारांच्या पुढे गेली होती.

Lockdown announced for the third time in France

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात