फ्रान्समध्ये एक महिन्याचा लॉकडाउन,संक्रमण वाढले ; कोरोनाची तिसरी लाट

वृत्तसंस्था

पॅरिस : फ्रान्समध्ये कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे पंतप्रधान जीन कैस्टेक्स यांनी पॅरिससहीत देशातील 16 ठिकाणी एका महिन्याच्या लॉकडाउनची घोषणा केलीOne month lockdown in France,Infections increased; The third wave of corona

शुक्रवारी मध्यरात्रीपासून चार आठवड्यांसाठी हा लॉकडाउन आहे. मार्च आणि नोव्हेंबरसारखे कठोर निर्बंध नसतील. शाळा आणि अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.या लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडता येणार आहे. मात्र मित्रांच्या घरी पार्टी करणे, सोशल डिस्टन्सींगचे नियम न पाळणे, मास्क न घालण्यासाठी हा लॉकडाउन लागू नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं,” असे पंतप्रधान म्हणाले.

लोकांनी वर्क फ्रॉम होम पर्याय निवडावा तसेच परवानगी पत्र असेल तरच लोकांना घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी आणि व्यायाम करण्याची परवानगी असेल. कोणालाही घरापासून 10 किमीपेक्षा जास्त दूर जाता येणार नाही. रात्री कर्फ्यू लागू आहे.

One month lockdown in France,Infections increased; The third wave of corona

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*