OMG ! ये मेरा इंडिया : हॉप शूट ;भारतीय शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ; ही जगातील सर्वात महाग भाजी पिकतेय बिहारमध्ये ; किंमत ऐकून व्हाल थक्क


  • सहसा ही भाजी 1000 युरो प्रति किलो म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 80 हजार रुपये किलो आहे. किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसला असेलच. चला आज आम्ही तुम्हाला या भाजीपाल्याच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत. OMG ! worlds most costliest vegetable crop Hopshoots cultivated in Bihar Aurangabad district by farmer Amresh Singh

विशेषप्रतिनिधी

पटणा : आपण भाज्या घेतांना बरीच घासाघीस करतो. जास्तीत जास्त किती महागडी भाजी आपण पाहिली असेल?हा प्रश्न कोड्यात टाकणारा नक्कीच आहे. कारण बाजारात भाज्यांचे भाव थोडेजरी वाढले, तरी आपण ओरडतो. कारण आपल्याकडे असलेल्या भाज्यांचा दर फार तर फार 100 रुपये किलोच्या आसपास असतो. मात्र, अशी एक भाजी आहे जिचा दर तब्बल 1 लाख रुपये किलो आहे.

या भाजीचं नाव आहे हॉप-शूट्स (hop-shoots). या भाजीचा उपयोग यापूर्वी औषध तयार करण्यासाठी व्हायचा. मात्र आता हॉप-शूट्सचा वापर भाजी म्हणूनसुद्धा होतो आहे. असं म्हटलं जातं की, या भाजीचा उपयोग शरीरातील कॅन्सरस सेल्स मारण्यासाठी होतो. त्यासाठी ही भाजी चांगल्या प्रकारे काम करते. हॉप-शूट्सच्या याच गुणधर्मामुळे ही भाजी जगातील सर्वात महागडी असून त्याची किंमत तब्बल 1 लाख रुपये किलोच्या आसपास आहे.


मध्यरात्री औरंगाबादेत भाजपचे जोरदार आंदोलन, रात्रीतूनच भाजी मंडई हटवण्याचा प्रशासनाचा डाव उधळला


ही एक भाजी आहे जी तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये किंवा बाजारात क्वचितच दिसते. याचे कारण बीअरच्या वापरासाठी त्याची लागवड केली जाते. या फुलाला ‘हॉप कॉन्स’ म्हणतात. ते फूल बिअरमध्ये वापरले जाते. त्याच्या बाकीची डहाळी अनेक प्रकारे खाल्ली जाते.

इतिहास

इ.स. 800 च्या आसपास याची गुणवत्ता जगाला कळली. की बिअरची चव हॉप कॉन्स मिसळल्याने चांगली होते. उत्तर जर्मनीमधील शेतकरी प्रथम बिअरची चव वाढविण्यासाठी याची लागवड करण्यास सुरवात करतात. त्या दिवसांत दलदलीच्या भागात वाढणारी कडू तण आणि झाडे बिअर बनवण्यासाठी वापरली जात होती. त्यांच्यावरही कर लावला जात असे. 1710 मध्ये इंग्लंडच्या संसदेने हॉप्सवर कर लावला. सर्व बिअर बनविण्यामध्ये हॉपचा वापर करावा, असेही आदेश देण्यात आले. तेव्हापासून याचा वापर बिअरची चव वाढवण्यासाठी केला जात आहे.

औषधी गुणधर्म देखील समृद्ध

हॉप औषधी वनस्पती म्हणून देखील वापरली जाते.शतकानुशतके याचा उपयोग दातदुखीपासून मुक्त करण्यासाठी, टीबीवरील उपचारांसाठी केला जात आहे.हॉपमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म आढळून आले आहेत. तसेच या भाजीचा उपयोग शरीरातील कॅन्सरस सेल्स मारण्यासाठी होतो.

अन्य वापर

ही भाजी कच्ची खाल्ली जाऊ शकते. पण बर्‍यापैकी कडू.  सलाडमध्ये कांद्या सारखा हॉप ट्वीजचा वापर केला जाऊ शकतो.आपण ते ग्रिल देखील करू शकतो किंवा लोणचे बनवू शकतो.

https://twitter.com/supriyasahuias/status/1377111139914444809?s=20

शेती कशी केली जाते?

ही एक सदाहरित भाजी आहे जी वर्षभर वाढू शकते.परंतु यासाठी थंड हवामान चांगले मानले जात नाही. मार्च ते जून हा लागवडीसाठी एक आदर्श काळ मानला जातो.यासाठी ओलावा आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. या वातावरणात, ही वनस्पती वेगाने वाढते आणि या भाजीचे डहाळे एका दिवसात 6 इंच पर्यंत वाढतात. सुरुवातीला त्याची फांदी जांभळ्या रंगाची असते पण नंतर ती हिरवी होते.

बिहारच्या औरंगाबादेत होतेय शेती

बरं हॉप-शूट्स या भाजीची चर्चा नेमकी आताच का होतेय हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर, हॉप-शूट्स चर्चेत येण्याचं कारण म्हणजे जगातील सर्वात महागडी भाजी चक्क भारतात पिकवली जातेय. बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील अमरेश सिंह नावाचा शेतकरी या भाजीची शेती करतोय. मिळालेल्या माहितीनुसार हॉप शूट्स या भाजीच्या फुलाला ‘हॉप कोन्स’ म्हणतात. या फुलाचा उपयोग बियर तयार करण्यासाठी केला जातो. तर या हॉप-शूट्सच्या फांद्यांचा उपयोग भाजी तयार करण्यासाठी केला जातो.

थेट आएएस अधिकाऱ्याने घेतली दखल

दरम्यान, शेतकऱ्याच्या या शेतीची दखल थेट आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी घेतली आहे. याच कारणामुळे हॉप-शूट्सच्या शेतीची चर्चा संपूर्ण भारतभर होतेय. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार हॉप-शूट्स ही जगातील सर्वात महागडी भाजी असून औरंगाबाद जिल्ह्यातील अमेरश सिंह हे या भाजीची शेती करतात. अशा प्रकारची शेती करणारे भारतातील ते पहिलेच शेतकरी आहेत. सुप्रिया साहू यांनी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारची शेती ही भारतीय शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरू शकते.

OMG ! worlds most costliest vegetable crop Hopshoots cultivated in Bihar Aurangabad district by farmer Amresh Singh

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात