BJPs Strong Agitation At midnight in Aurangabad, administrations attempt to remove vegetable market failed

मध्यरात्री औरंगाबादेत भाजपचे जोरदार आंदोलन, रात्रीतूनच भाजी मंडई हटवण्याचा प्रशासनाचा डाव उधळला

वाळूजमधील 25 वर्षे जुनी भाजी मंडई हटवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. याविरुद्ध शहर भाजपने दंड थोपटले असून प्रशासनाच्या निर्णयाविरोधात मध्यरात्रीच ठिय्या आंदोलन करून जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी वाळूज परिसरात जमून भाजी विक्रेत्यांच्या बाजूने आंदोलनाला सुरुवात केली. अचानक झालेल्या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. काही काळ येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. BJPs Strong Agitation At midnight in Aurangabad, administrations attempt to remove vegetable market failed


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : वाळूजमधील 25 वर्षे जुनी भाजी मंडई हटवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. याविरुद्ध शहर भाजपने दंड थोपटले असून प्रशासनाच्या निर्णयाविरोधात मध्यरात्रीच ठिय्या आंदोलन करून जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी वाळूज परिसरात जमून भाजी विक्रेत्यांच्या बाजूने आंदोलनाला सुरुवात केली. अचानक झालेल्या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. काही काळ येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

25 वर्षे जुनी भाजी मंडई

वाळूजच्या मोहटादेवी भागात तब्बल 25 वर्षे जुनी भाजी मंडई आहे. ती हटवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालवले आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात भाजी विक्रेत्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात केली. मंगळवारी मध्यरात्री वाळूज परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जमून आंदोलन केले. यादरम्यान रस्त्यावर टायर पेटवण्यात आले होते. पोलिसांच्या बॅरिकेड्सला न जुमानता भाजप कार्यकर्त्यांनी तुफान घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता.

काय आहे मूळ वाद?

वाळूज औद्योगिक वसाहतीतील या भूखंडाचा मूळ वाद आहे. या जागेवर 25 वर्षांपूर्वी भाजीमंडईसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. येथून भाजी मंडई हटवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालवले होते. याविरुद्ध स्थानिक भाजी विक्रेत्यांचा संघर्ष सुरू होता. गुरुवारी रात्री राज्यमंत्री अब्दुल सत्तार आंदोलकांची भेट घेऊन निघून गेले. परंतु दिलासा न झाल्याने भाजी विक्रेत्यांनी न्यायासाठी भाजपकडे धाव घेतली. यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष संजण केणेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांसह मध्यरात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी धाव घेऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर मध्यरात्रीच भाजपच्या नेतृत्वात भाजीमंडईच्या जागेसाठी आक्रमक आंदोलनाला सुरुवात झाली. दरम्यान, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

‘व्यापाऱ्यांना देशोधडीला लावून भूखंडाचं श्रीखंड खाण्याचा शिवसेनेचा डाव’

यावेळी संजय केणेकर म्हणाले की, ज्यांचे हातावर पोट आहे, असे भाजी विक्रेते मागच्या 25 वर्षांपासून येथे रोजीरोटी मिळवतात. हा मोकळा भूखंड आहे. एमआयडीसी अंतर्गत असलेली ही जागा भाजीमंडईला सहज देता येऊ शकते. परंतु काही शिवसेना आणि तिघाडी सरकारच्या नेत्यांनी संगनमताने हा भूखंड विकण्याचा घाट घातला आहे. हा भूखंड विकून त्याऐवजी शॉपिंग कॉम्प्लेक्स काढण्याचा डाव आहे. भाजीमंडईची जागा गेल्यास अनेकांवर आत्महत्येची वेळ येईल, पण आम्ही तसे होऊ देणार नाही. व्यापाऱ्यांची रोजी रोटी हिसकावून शिवसेना आणि तिघाडी सरकारला भूखंडाचं श्रीखंड खायचं आहे, असा आरोपही केणेकर यांनी केला.

BJPs Strong Agitation At midnight in Aurangabad, administrations attempt to remove vegetable market failed

केणेकर पुढे म्हणाले की, शिवसेनेने पोलिसांना चिथावणी देऊन या गोरगरीब लोकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला आहे. रात्रीच्या अंधारात पोलीस कारवाई करून या लोकांना हटवण्याचा प्रयत्न होता, म्हणूनच गोरगरिबांसाठी आम्ही मध्यरात्री आंदोलन सुरू केले.

व्हिडिओ सौजन्य : एमसीएन न्यूज औरंगाबाद https://www.facebook.com/646951085512501/videos/143625070934315

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*